शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं अन्...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 11:07 IST

लग्नाच्या वरातीत नाचताना नवरदेवाच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. डान्स करताना तो जमिनीवर पडतो, त्यानंतर उठत नाही.

मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लग्नाच्या वरातीत नाचताना नवरदेवाच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. डान्स करताना तो जमिनीवर पडतो, त्यानंतर उठत नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची वरात ही कानपूरहून रीवा येथे आली होती. बँडबाजाच्या तालावर पाहुणे मंडळी नाचत लग्नाच्या ठिकाणाकडे निघाले होते. तेव्हा वरातीत सहभागी असलेला 32 वर्षीय अभय सचान आनंदाने नाचत होता. डान्स सुरू असताना तो अचानक जमिनीवर पडला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण आनंदाचे शोकाकुल वातावरणात रुपांतर झाले.

मंगळवारी रात्री उत्तर प्रदेशातील कानपूर येथून रीवा बस स्थानकाजवळील अमरदीप पॅलेसमध्ये वरात आली. नवरी रेवा येथील रहिवासी आहे. नवरदेवाचा मित्र अभय सचानही लग्नात सहभागी होण्यासाठी कानपूरहून रीवाला आला होता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सर्व नातेवाईक गात, नाचत जात होते. कडाक्याच्या थंडीत अभय सचानही इतर लोकांसह नाचत होता. काही वेळाने तो नाचत असताना अचानक खाली पडला, त्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. बँड लगेचच बंद करण्यात आला.

अभयला तातडीने संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तोपर्यंत अभयचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो नाचत करताना जमिनीवर पडला होता. अभय हा एजी आवास विकास कॉलनी, हंसापुरम, कानपूर, यूपीचा रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक रेवा येथे आले. रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न