शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! 13 तारखेला लग्न, 16 ला रिसेप्शन, 17 ला नवरदेवाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 13:58 IST

लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

लग्नाच्या सीझनमध्ये बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण मुंगेर जिल्ह्य़ातील आहे, जिथे लग्न समारंभ सुरू असलेल्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील भुसा गली येथील दुर्गा प्रसाद यांचा एकुलता एक मुलगा 30 वर्षीय आशिष कुमार याचा विवाह 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला.

एकुलत्या एक मुलाच्या लग्नामुळे दुर्गा प्रसाद य़ांच्यासह संपूर्ण कुटुंब खूप आनंदी होते. वडिलांनी मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. पाटणा येथील रहिवासी अशोक कुमार सिंह आणि किरण कुमारी रंजन यांची मुलगी करिश्मा हिचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला लग्नाची मिरवणूक मुंगेरला परतली, तर 16 फेब्रुवारीला रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.

17 फेब्रुवारीला करिश्मा माहेरी गेली. करिश्मा आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर आशिष त्याच्या घरी पाहुण्यांची सेवा करण्यात व्यस्त राहिला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरात विखुरलेल्या वस्तू त्याने व्यवस्थित केल्या आणि रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो वडिलांना फोन करू लागला.

आशिष पलंगावरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. त्याचे वडील व इतर कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचले तोपर्यंत आशिषचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी सदर रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. एकुलता एक मुलगा गमावल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :marriageलग्न