शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! कॅन्सरपीडित आईच्या मृत्युमुळे शोक अनावर, २० वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 14:33 IST

Family News: कर्करोगामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर शोक अनावर झालेल्या एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

उना (हिमाचल प्रदेश) - कर्करोगामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर शोक अनावर झालेल्या एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यात घडली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उना जिल्ह्यातील उपमंडल गगरेट अंतर्गत संघनेई गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये कर्करोगग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेच्या शोक अनावर झालेल्या मुलीने दु:खाच्या आवेगात विषप्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केली.

संघनेई गावातील ही महिला गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगग्रस्त होती. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास हतबलता व्यक्त केली. त्यामुळे तिचे नातेवाईक घरीच तिच्यावर उपचार करत होते. या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. या महिलेची २० वर्षीच मुलगी आईच्या जाण्याचे दु:ख सहन करू शकली नाही. त्यातच तिने विषप्राशन केले. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची गंभीर अवस्था पाहून तिला विभागीय रुग्णालयात उना येथे पाठवण्यात आले आहे. मात्र उपचारांदरम्यान, या तरुणीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांकडे सोपवला आहे. गावातील सरपंच त्रिलोक कुमार यांनी सांगितले की, या मुलीची आई दोन वर्षांपासून कर्करोगाशी झगडत होती. रात्री उशिरा तिच्या मृत्यूनंतर मुलीची प्रकृतीही बिघडू लागली. तेव्हा तिचे नातेवाईक तिला रुग्णालयात घेऊन गेले, तिथे तिचा मृत्यू झाला. उनाचे एसी अर्जित सेन यांनी या घटनेला दुजोरा देत या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याचे सांगितले.  

टॅग्स :FamilyपरिवारHimachal Pradeshहिमाचल प्रदेशcancerकर्करोग