मोदींसाठीच्या पर्यायी विमानात ग्रेनेड आढळल्याने खळबळ

By Admin | Updated: October 4, 2014 14:46 IST2014-10-04T14:29:36+5:302014-10-04T14:46:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यासाठी ठेवलेल्या पर्यायी विमानात निकामी ग्रेनेड आढळल्याने खळबळ माजली आहे.

The grenade was found in an alternate plane for Modi | मोदींसाठीच्या पर्यायी विमानात ग्रेनेड आढळल्याने खळबळ

मोदींसाठीच्या पर्यायी विमानात ग्रेनेड आढळल्याने खळबळ

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यासाठी ठेवलेल्या पर्यायी विमानात निकामी ग्रेनेड आढळल्याने खळबळ माजली आहे. सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर चूक मानली जात आहे. 
मोदी नुकतेच पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यावर जाऊन आले. याच दौ-यासाठी ‘एअर इंडिया‘चेच आणखी एक विमान राखीव म्हणून ठेवण्यात आले होते. पंतप्रधानांच्या विमानात काही अडचणी आल्या असत्या तर हे अतिरिक्त विमानाचा उपयोग केला गेला असता. मात्र कोणतीही तांत्रिक अडचण न आल्याने या विमानाचा वापर केला गेला नाही. पंतप्रधानांचा अमेरिका दौरा पूर्ण झाल्यावर हे विमान पुन्हा प्रवासी वाहतूक सेवेत दाखल करण्यात आले. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे  विमान दिल्ली-मुंबई-हैदराबाद-जेद्दाला पाठवण्यात आले.  जेद्दा येथे पोहचल्यानंतर सुरक्षा रक्षकांना विमानात निकामी ग्रेनेड आढळला. पंतप्रधानांसाठी वापरण्यात येणा-या विमानात ग्रेनेड आढळल्याने सुरक्षा एजन्सीत मोठी खळबळ माजली असून याप्रकरणी कसून चौकशी होत आहे. 

Web Title: The grenade was found in an alternate plane for Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.