छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन - जोड
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:03+5:302015-02-20T01:10:03+5:30
भारिप बहुजन महासंघ

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन - जोड
भ रिप बहुजन महासंघछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाठोडा येथील पक्षाच्या कार्यालयात शहर अध्यक्ष विनोद गजभिये, देवेंद्र मेश्राम, अंबादास गजभिये, सोमेश्वर नागदेवते, प्रवीण रंगारी, विनोद नाईक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विनोद मेश्राम यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. नागपूर शहर काँग्रेस कमिटी ब्लॉक नं. ९नागपूर शहर काँग्रेस कमिटी ब्लॉक नं. ९ त्रिमूर्तीनगर सुभाषनगरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम पारमोरे, सुरेंद्र तिवारी, हरी नायर, साहेब साबळे, अनंत कोशेट्टीवार, कमलेश लारोकर, बाळकृष्णा तुराळे, संजय बोबडे, संजय तुरणकर आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन युथ फोर्सपीपल्स रिपब्लिकन पार्टीप्रणीत रिपब्लिकन युथ फोर्सतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमत्त महाल येथील पुतळ्याला जयदीप कवाडे यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कवाडे यांनी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला कपील लिंगायत, अजय चव्हाण, प्रज्योत कांबळे, स्वप्नील महल्ले, प्रकाश कांबळे, नीलेश बोरकर, नितीन खेडकर, महेंद्र पावडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघमहासंघाच्या वतीने महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या महाल येथील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कास्ट्राईबचे अध्यक्ष अरुण गाडे, राजेश ढेंगरे, सुगत रामटेके, संजय सायरे, रेखा लोखंडे, अहिंसक लखोटे, ॲड. हरिहर बोरकर, विनेश शेवाळे, संजय गोडघाटे आदी उपस्थित होते. नॅशनल पीपल्स सोशल ऑर्गनायझेशनसंघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाल येथील महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, नगरसेविका सुजाता कोंबाडे, डॉ. दिलीप सुखदेवे, अमर रामटेके, डॉ. विठ्ठल कोंबाडे आदी उपस्थित होते. गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थाअध्यापक लेआऊट, हिंगणा रोड येथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष म्हणून कवीश्वर करुटकर, मार्गदर्शक शिवाजी तोडासे, सविता नितनवरे, लीला नारखेडे, पुष्पा मडावी उपस्थित होते. याप्रसंगी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित वक्त्यांनी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.