छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:40+5:302015-02-20T01:10:40+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Greetings to Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
नागपूर : शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध शाळा, संस्था, संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही संस्थांनी यानिमित्त रॅली काढली. शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान
प्रतिष्ठानाच्यावतीने महाराजांच्या जयंतीनिमित्त महाल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. राजेंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केले. यावेळी आयोजित गोंधळ स्पर्धेत विविध शाळांनी नृत्य सादर केले. याप्रसंगी दिल्ली येथे लेझीम सादर करण्यासाठी प्रतिनिधित्व केलेल्या २१ शाळांच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रभाकर कापसे, इतिहासकार चंद्रशेखर गुप्त, क्रीडा सामाजिक कार्यकर्ते डॉ. हंबीरराव मोहिते, पत्रकार वैभव गांजापुरे, एबीपी माझाच्या पत्रकार सरिता कौशिक, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खानोरकर, नाट्य कलावंत लक्ष्मण जाधव, मूर्तिकार मनोज सुंकूरवार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्व. माधवराव चांदपूरकर स्मृती पुरस्काराने पोलीस कर्मचारी सुखदेव धुर्वे यांना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला खा. कृपाल तुमाने, आ. कृ ष्णा खोपडे, विकास कुंभारे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, राजे मुधोजी भोसले आदी उपस्थित होते.
विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था
अजनी येथील पतसंस्थेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक नगराळे, सचिव ज्ञानेश्वर महल्ले यांनी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
जेसीआय नागपूर कळमना सिटी
जेसीआय नागपूर कळमना सिटीच्या अध्यक्ष रूपाली जिचकार यांच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. महाल येथील महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृष्णकुमार जैस, पंकज वर्मा, आशिष जिचकार, अंकेश शाहू, निखिल ठाकरे, रंजना डोंगरे, मंगेश कोलरवार, नीरज हिवसे, भारती उपासे, उज्ज्वला मुकादम उपस्थित होते.
साकार मागासवर्गीय विकास मंडळ
मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खापरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन क रण्यात आले. यावेळी सलामी देऊन महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी अमित हजारे, पुरुषोत्तम कांबळे, रंजित बेले, सुदर्शन गोडघाटे उपस्थित होते. मिठाईचे वाटपही करण्यात आले.

Web Title: Greetings to Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.