शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सर्वपक्षीय खासदारांकडून दिल्लीत शाहू महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 03:53 IST

मराठा आरक्षणाचीही मागणी; संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद

नवी दिल्ली/कोल्हापूर : आपल्या संस्थानातील मागास समाजाला ११७ वर्षांपूर्वी आरक्षण लागू करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना गुरुवारी दिल्ली येथे अभिवादन करण्यात आले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वपक्षीय खासदार संसद प्रांगणातील शाहू महाराजांच्या पुतळा परिसरात उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाचीही मागणी करण्यात आली.खासदार संभाजीराजे म्हणाले, गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलने करीत आहे. गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून ५८ मूक मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले गेले. हे मोर्चे अतिशय शांततेत काढून मराठा समाजाने जगासमोर एक आदर्श निर्माण केला होता; परंतु आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे समाजाने पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे. आजपर्यंत दोन युवकांनी आत्महत्या केली आहे. पात्रता असूनही आरक्षणाअभावी शिक्षण, नोकºयांमध्ये संधी मिळत नसल्याने या समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. म्हणूनच तातडीने आरक्षण मिळण्याची गरज आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार धनंजय महाडिक, आनंदराव आडसूळ यांच्यासह अन्य खासदार उपस्थित होते.महाराष्ट्र सदनात तरुणांचा जथा धडकलाडोक्यावर मराठा मोर्चा लिहिलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या घातलेल्या २००-२५० तरुणांचा जथा गुरुवारी नवीन महाराष्टÑ सदनात धडकला. एरवी महाराष्टÑ सदनाच्या उपहारगृहात जेवायला जायचे असल्यासही झाडाझडती घेणाºया सुरक्षा रक्षकांनी कुणालाही अडविले नाही.कस्तुरबा मार्गावरून जय मराठा, ‘एकच मिशन-मराठा आरक्षण’, अशा गगनभेदी घोषणा देत हा जत्था थेट महाराष्टÑ सदनाच्या लॉबीमध्ये घुसला. हे सर्व तरुण करोलबागमध्ये राहत असून त्यांचा सराफा व्यवसाय आहे. महाराष्टÑ सदनाच्या लॉबीमध्ये आंदोलनकर्त्यांच्या घोषणा सुरू असतानाच खा. संभाजीराजे छत्रपती तिथे आलेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याची ग्वाही दिली.

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाreservationआरक्षण