शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

ग्रीनपीसकडून भारतीय चहा उद्योगास घातपाताचा प्रयत्न

By admin | Updated: April 13, 2015 23:33 IST

हानिकारक कीटकनाशक असल्याचा प्रचार परदेशात करून ग्रीनपीस इंडिया भारतीय चहा उद्योगाचे मोठे नुकसान करीत असल्याचा गृहमंत्रालयाचा आरोप आहे.

नवी दिल्ली : भारतात पिकविण्यात येत असलेल्या चहाच्या पानात हानिकारक कीटकनाशक असल्याचा प्रचार परदेशात करून ग्रीनपीस इंडिया भारतीय चहा उद्योगाचे मोठे नुकसान करीत असल्याचा गृहमंत्रालयाचा आरोप आहे. भारतीय चहा उद्योगात तब्बल ३५ लाख कर्मचारी कामाला असून या उद्योगाने गेल्या वर्षी निर्यातीतून ६४.४ कोटी डॉलरची कमाई केली आहे.ग्रीनपीस इंडियाच्या कारवायांबद्दल गृहमंत्रालयाने केलेल्या अहवालानुसार या अशासकीय संघटनेने ‘ट्रबल ब्रुर्इंग आॅन इंडियन टी’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात चहामध्ये हानिकारक, असे कीटकनाशक असल्याचे म्हटले आहे. ग्रीनपीसचा असा दावा आहे की भारतातील प्रमुख चहा कंपन्यांच्या (ब्रँडस्) उत्पादनात हानिकारक कीटकनाशक आढळले आहेत. हे सगळे ब्रँडस् अमेरिका, ब्रिटन व युरोपमध्ये निर्यात केले जातात, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. ग्रीनपीसने फोरेन्सिक विश्लेषण प्रसिद्ध केलेले नाही. गुप्तहेरांकडून समजलेल्या माहितीनुसार हे विश्लेषण युरोपमधील कोणत्या तरी देशातील खासगी प्रयोगशाळेत करण्यात आले आहे.भारतीय चहा मंडळाला हे निष्कर्ष मान्य नाहीत व हे निष्कर्ष भारताच्या चहा निर्यातीवर परिणाम करणारे आहेत, असे मंडळाचे मत आहे. ग्रीनपीसची चहाविरोधी मोहीम ही चिनी चहा कंपन्यांच्याविरोधातील मोहिमेसारखीच आहे. एप्रिल २०१२ मध्ये ग्रीनपीसने असाच वादग्रस्त अहवाल ‘चिनी चहामध्ये लपलेले तत्त्व’ या नावाने प्रसिद्ध केला होता. त्यात १८ नमुन्यांमध्ये २९ वेगवेगळी कीटकनाशके सापडल्याचा दावा केला होता. ग्रीनपीसने गहू, तांदूळ अशा धान्यांनाही लक्ष्य केले असून त्यात होणारा कीटकनाशकांचा दुरुपयोग समोर आणण्याचा निर्णय घेतला आहे.४जगातील प्रमुख चहा उत्पादक देशांत भारताचे स्थान आहे. भारतात तयार होणारा चहा जगातील सर्वात उत्तम चहा समजला जातो. आसाम, दार्जिलिंग व उत्तर बंगालचा दुआब हा पूर्वोत्तर भारत प्रमुख चहा उत्पादक क्षेत्र आहे. याशिवाय दक्षिण भारतातील निलगिरी हा भागही प्रमुख चहा उत्पादक आहे.४चहा क्षेत्र देशात रोजगार देणारा दुसरा प्रमुख उद्योग आहे. १५०० पेक्षा जास्त चहाच्या बागांमध्ये ३५ लाखांपेक्षाही जास्त कर्मचारी आहेत. २०१४ मध्ये भारतात ११८.५० कोटी किलो चहाचे उत्पादन झाले होते.