शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

हरित न्यायाधिकरणात एकल पीठांना मनाई, सुप्रीम कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 04:24 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) अध्यक्षांनी दिल्लीमधील मुख्य न्यायपीठात किंवा कोणत्याही क्षेत्रीय खंडपीठांमध्ये प्रकरणांच्या सुनावणीचे काम कोणाही एकल सदस्याकडे देऊ नये, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) अध्यक्षांनी दिल्लीमधील मुख्य न्यायपीठात किंवा कोणत्याही क्षेत्रीय खंडपीठांमध्ये प्रकरणांच्या सुनावणीचे काम कोणाही एकल सदस्याकडे देऊ नये, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.प्रत्येक प्रकरणाच्या सुनावणीसाठी एक न्यायिक सदस्य व एक तज्ज्ञ सदस्य यांचे द्विसदस्य खंडपीठच नेमले जावे, असा आदेशही सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. हरित न्यायाधिकरणाच्या नियमावलीत केंद्र सरकारने अलीकडेच दुरुस्ती करून एकल सदस्यही प्रकरणांवर सुनावणी करू शकेल, अशी तरतूद केली. न्यायाधिकरणाच्या पुणे येथील पश्चिम क्षेत्रीय खंडपीठातील वकील संघटनेने त्यांचे अध्यक्ष अ‍ॅड. सौरभ कुलकर्णी यांच्यामार्फत याचिका करून यास आव्हान दिले आहे.केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी न्यायाधिकरणात सदस्यांच्या जागा मोठ्या संख्येने रिकाम्या असण्याची अडचण पुढे केली. त्यावर याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी म्हणाले की, सदस्यांच्या पुरेशा संख्येअभावी न्यायाधिकरण चालू शकत नसेल तर एकल सदस्याने ती बेकायदा चालविणे हा पर्याय नाही. न्यायाधिकरण बंद करून प्रकरणे उच्च न्यायालयाकडे पाठवावी. तज्ज्ञ सदस्य एकटे प्रकरणे ऐकत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.४० पैकी फक्त सहा सदस्यनियमित अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार १९ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यापासून न्यायाधिकरणाचे काम कार्यवाहक अध्यक्ष न्या. यू. डी. साळवी पाहात आहेत. रिक्त जागा वेळीच भरल्या न गेल्याने सध्या न्यायाधिकरणावर४०पैकी फक्त सहा सदस्य आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणे अशक्य होऊन बसले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत