रायपूर - छत्तीसगडचेमुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी रायपूरमध्ये आयोजित सकल दिगंबर जैन समाजाद्वारे आयोजित मैत्री महोत्सवाला भेट दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑडिटोरियममध्ये पूज्य आर्यिकारत्न १०५ अंतर्मती माताजी ससंघ यांच्या सानिध्यात आयोजित गुरू शरणम्-मैत्री महोत्सव-क्षमादान उत्सवामध्ये आमदार राजेश मुणत, जैन समाजातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी मंचावर पूज्य आर्यिकारत्न १०५ अंतर्मती माताजी ससंघ यांना श्रीफळ भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी जैन समाजातील पारंपरिक पगडी आणि शाल घालून मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात आले. तर या प्रसंगी मु्ख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले. तसेच आचार्य विद्यासागर कल्याण सेवा संस्थानच्या लोगोचं अनावरण केलं.
मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले की, मैत्री महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नाही तर आत्मिक जागृती आणि शुद्धिकरणाचा पावन उत्सव आहे. भारताची ही पुण्यभूमी केवळ संस्कृतीची जननीच नाही तर आध्यात्मिकतेची जिवंत प्रयोगशाळा राहिलेली आहे. येथे धर्म केवळ पूजेपर्यंत मर्यादित नाही तर तो जीवन जगण्याची कला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भगवान महावीर स्वामी यांनी जगा आणि जगू द्या हा संदेश दिला. हल्लीच साजऱ्या झालेल्या क्षमादान पर्वाचं सारही हेच आहे. क्षमाशिलता हाच मोठेपणा आहे आणि हाच वसुधैव कुटुंबकमचा खरा संदेश आहे. जैन धर्माने या भावनेला सर्वात सुंदर आणि सखोलतेने प्रस्तुत केले आहे. जैन समाज हा परोपकारी आहे आणि त्याच्या सेवाभावाचा लाभ हा छत्तीसगडला सातत्याने मिळत राहील, असा विश्वासही विष्णुदेव साय यांनी यावेळी व्यक्त केला.
Web Summary : Chhattisgarh Chief Minister Vishnu Deo Sai attended a Jain community event in Raipur, highlighting forgiveness as greatness and the essence of 'Vasudhaiva Kutumbakam'. He praised the Jain community's selfless service to Chhattisgarh, emphasizing their profound contribution to spiritual and cultural values.
Web Summary : छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री विष्णु देव साय ने रायपुर में जैन समुदाय के कार्यक्रम में क्षमाशीलता को महानता और 'वसुधैव कुटुम्बकम' का सार बताया। उन्होंने छत्तीसगढ़ के प्रति जैन समुदाय की निस्वार्थ सेवा की सराहना की, और उनके आध्यात्मिक योगदान पर ज़ोर दिया।