महात्वाचे
By Admin | Updated: February 10, 2015 00:55 IST2015-02-10T00:55:46+5:302015-02-10T00:55:46+5:30
रमाईचे त्यागमय जीवन प्रेरणा देणारे

महात्वाचे
र ाईचे त्यागमय जीवन प्रेरणा देणारेनागपूर : रमाई स्मारक बौद्ध मंडळातर्फे रमाई बुद्धविहार उंटखाना येथे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित ॲड. रमेश शंभरकर म्हणाले की, अत्यंत गरिबीचे जीवन जगत असताना त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. त्यांचे त्यागमय जीवन समाजाला प्रेरणा देत राहील. समाजाच्या विकासासाठी सर्व संस्थांनी कार्य करावेनागपूर : सर्वश्री महाविद्यालयाच्या सभागृहात जनकल्याण सामाजिक संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित डॉ. नरेंद्र भुसारी म्हणाले की समाजाच्या विकासासाठी सर्व संस्थांनी पुढाकार घ्यावा. यावेळी राजू हवेलीकर, राजेश मासुरकर, रामगोपाल ताम्हणपुरे, सचिन लिहितकर, मनीष कांडलकर उपस्थित होते.आरोग्य तपासणी शिबिर नागपूर : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील अभ्यासकें द्राद्वारे व्ही.एम.व्ही. महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. मेहता, केंद्र संयोजक प्रा. अनिल गोरे, मनीष दुरुगकर उपस्थित होते. डॉ. आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरच्या संदर्भात पालकमंत्र्यांची भेटनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उत्तर नागपूरमधून कामठी येथे स्थलांतरित करण्याच्या मुद्यावरून विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. हे सेंटर उत्तर नागपुरातच राहील असे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले. जमिनीच्या आरक्षणाचा तांत्रिक प्रश्न लवकर सोडवू असेही ते म्हणाले.