शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाकिस्तानवर भारी पडणारा ग्लाइड बॉम्ब, भारताच्या DRDO ने विकसित केले स्मार्ट वेपन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 14:05 IST

रणांगणात शत्रूच्या सैन्याला सळो कि पळो करुन सोडणा-या ग्लाइड बॉम्बची शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ठळक मुद्देबॉम्बच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओ आणि इंडियन एअर फोर्सचे अभिनंदन केले. मागच्यावर्षी मे महिन्यात डीआरडीओने जॅग्वार विमानातून या बॉम्बची   पहिली चाचणी केली होती. 

नवी दिल्ली - रणांगणात शत्रूच्या सैन्याला सळो कि पळो करुन सोडणा-या ग्लाइड बॉम्बची शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे स्मार्ट वेपन डीआरडीओने विकसित केले आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानाने ग्लाइड बॉम्ब टाकल्यानंतर या बॉम्बने प्रसिजन नेवीगेशन सिस्टिमच्या आधारे 70 किलोमीटरच्या टप्प्यातील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या ग्लाइड अस्त्रामुळे भारताची चीन-पाकिस्तानविरोधात क्षमता अधिक वाढणार आहे. 

हे स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन आहे. ग्लाइन बॉम्बच्या घेण्यात आलेल्या तीन चाचण्या यशस्वी ठरल्या. या बॉम्बच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओ आणि इंडियन एअर फोर्सचे अभिनंदन केले. यशस्वी चाचणीमुळे ग्लाइड बॉम्बचा भारतीय हवाई दलात समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

2013 मध्ये अशा प्रकारचा बॉम्ब विकसित करायला मंजुरी मिळाली होती. मागच्यावर्षी मे महिन्यात डीआरडीओने जॅग्वार विमानातून या बॉम्बची   पहिली चाचणी केली होती. 

काय आहे या बॉम्बचे वैशिष्टय ग्लाइड बॉम्बचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा बॉम्ब ठरलेल्या टार्गेटवर वरुन टाकावा लागत नाही. काही अंतरावरुन डागल्यानंतरही हा बॉम्ब शत्रूच्या तळांचा अचूक वेध घेतो. त्यामुळे आपल्या विमानाला असलेला धोका कमी होतो. जागतिक महायुद्धामध्ये सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारच्या बॉम्बचा वापर झाला होता. आता नवीन बदलांमुळे हे अस्त्र अधिक प्रभावी बनले आहे.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल