स्मशानभूमीची दयनीय अवस्था
By Admin | Updated: May 19, 2014 20:33 IST2014-05-19T19:18:06+5:302014-05-19T20:33:37+5:30
बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथील स्मशानभूमी टिनशेडची दयनीय अवस्था; दुरुस्तीची मागणी

स्मशानभूमीची दयनीय अवस्था
पिंजर: बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथील स्मशानभूमी टिनशेडची अवस्था दयनीय झाली असून, या शेडचे टीनपत्रे फुटले आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रोष व्यक्त होत आहे. पुढे पावसाळ्यात अंत्यसंस्कार विधीकरिता गाववासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. याबाबत ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा त्याची दखल घेतल्या जात नाही. परिसरात काटेरी झाडे-झुडपे व गाजर गवताचे प्रमाण वाढल्याने या ठिकाणी अंत्ययात्रेत सामील झालेल्या नाागरिकांना समस्या निर्माण होत आहे. स्मशानभूमीची साफसफाई व टिनशेड दुरुस्तीची मागणी गावकर्यांकडून होत आहे.