नवी दिल्ली, दि. 10 - नागपूर-हैदराबाद ही दोन महत्त्वाची शहरं. एक महाराष्ट्राची उपराजधानी तर दुसरी तेलंगणची राजधानी. व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या शहरातील रेल्वे प्रवासासाठी सध्या तब्बल नऊ तास प्रवास करावा लागतो. मात्र आता या दोन शहरांमध्ये सेमी-हायस्पीड रेल्वे सुरू करण्याचा सरकारचा विचार असून, ही योजना प्रत्यक्षात आल्यास हा प्रवास केवळ तीन तासांमध्ये होणार आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, रशियन रेल्वेच्या साह्याने या योजनेची व्यवहार्यता तपासण्यात येत आहे. त्यानंतर अंमलबजावणीच्या मंजुरीसाठी ही योजना रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे.
GRAPHIC - नागपूर-हैदराबाद सेमी-हायस्पीड रेल्वे धावणार, प्रवास केवळ होणार तीन तासांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:00 IST