कंधारात बैलजोडी अनुदान; विशेष घटक लाभार्थींचा ९४ लाख निधी पडून
By Admin | Updated: June 17, 2015 01:33 IST2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T01:33:08+5:30
कंधार : विशेष घटक योजनेतून लाभार्थींना बैलजोडी खरेदीसाठी प्रत्येकी ३० हजारांचे अनुनदान दिले जाते़ पं़स़ स्तरावर ३१३ लाभार्थ्यांचा ९३ लाख ९० हजारांचा निधी पडून आहे़ परंतु वितरणासाठी शासन निर्णय नसल्याने वाटप रखडले आहे़ त्यामुळे ऐन खरीप हंगामातील पेरणीसाठी लाभार्थ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे़

कंधारात बैलजोडी अनुदान; विशेष घटक लाभार्थींचा ९४ लाख निधी पडून
क धार : विशेष घटक योजनेतून लाभार्थींना बैलजोडी खरेदीसाठी प्रत्येकी ३० हजारांचे अनुनदान दिले जाते़ पं़स़ स्तरावर ३१३ लाभार्थ्यांचा ९३ लाख ९० हजारांचा निधी पडून आहे़ परंतु वितरणासाठी शासन निर्णय नसल्याने वाटप रखडले आहे़ त्यामुळे ऐन खरीप हंगामातील पेरणीसाठी लाभार्थ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे़ विशेष घटक योजना २०१४-१५ चे ता़उद्दिष्ट्य ३१९ होते़ तरीही ३२७ साध्य असल्याचे समजते़ १२ विहिरी मंजूर असून त्याचे काम चालू आहे़ इतर बाबीत शेती औजारे यंत्र, वखर, २ कोळपे, २ ताडपत्री, १ पेट्रोल फवारा आदी साहित्य लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले़ त्याचे वितरण जवळपास ७० टक्क्यापेक्षा जास्त झाले असून वाटप चालूच आहे़ परंतु बैलजोडी देण्यासाठी ३१३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली़ ९३ लाख ९० हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे़ परंतु वितरण मात्र रखडले आहे़विशेष घटक योजनेतून अनुसूचित जातीमधील लाभार्थ्यांना शेती व्यवसायासाठी विविध योजनेतूनच शेती साहित्य व बैलजोडी खरेदीसाठी अनुदान दिले जाते़ बैलजोडीसाठी प्रती लाभार्थी अनुदान ३० हजारांचे असते़ मागील वर्षी दुष्काळाने शेतकरी पिचून निघाला आहे़ पिकांची हानी झाली, पशूधनाचे संगोपन करण्यासाठी कसरत झाली़ अनेकांनी सालगडी पद्धत बंद केली़ कारण सालगडी ठेवणे अवघड झाले़ त्यात मागासवर्गीयांचे हाल मात्र वेगळेच आहेत़ भल्या-भल्या शेतकर्यांना शेती परवडत नाही़ हे दुष्काळातील स्थितीने सिद्ध झाले़ त्यासाठी विशेष घटक योजनेचा आधार मोलाचा ठरतो़विशेष घटक योजनेचा निधी उपलब्ध आहे़ परंतु त्याचे वितरण करण्यास शासन निर्णय झाला नाही़ त्यामुळे बारूळ, कौठा, फुलवळ, गऊळ, घागरदरा, कुरुळा, दिग्रस बु़, पेठवडज, घोडज, दिग्रस खु़, आंबुलगा, बहाद्दरपुरा, पानभोसी, चिखलभोसी, बाचोटी, चिखली, मानसपुरी, काटकळंबा, राऊतखेडा, लाडका, आलेगाव, दाताळा, मंगनाळी, शिराढोण, उस्माननगर आदी गावातील ३१३ लाभार्थी बैलजोडीचे अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत़ शासनाने तत्काळ निर्णय घेवून दिलासा देण्याची मागणी लाभार्थीतून केली जात आहे़