इंडस्ट्रीयल एक्स्पोचा भव्य शुभारंभ

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:09+5:302015-02-13T23:11:09+5:30

(८ बाय २)

Grand launch of Industrial Expo | इंडस्ट्रीयल एक्स्पोचा भव्य शुभारंभ

इंडस्ट्रीयल एक्स्पोचा भव्य शुभारंभ

(८
बाय २)
इंडस्ट्रीयल एक्स्पोचा भव्य शुभारंभ
नागपूर : इंदूर इन्फो लाईन प्रा. लि. तर्फे रेशीमबाग मैदानावर आयोजित तीन दिवसीय मेगा इंडस्ट्रीयल एक्स्पोचे उद्घाटन एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन सी. एम. रणधीर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले. एक्स्पोला भेट देण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध मशिनची माहिती जाणून घेतली. एक्स्पोमध्ये १०० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांचा समावेश आहे. यात सिम्फोनी, आर. आर. इस्पात, पायलट मशीन, बॉश, टीआयडीसी, कार्बोरेंडम युनिव्हर्सल, इन साईज, गाला श्रींक, बालाजी इंजिनिअरींग कोलकाता, सिम्फोनी कुलर्स, ब्रीज एअर कुलर्स, एस. ए. फील्ड, स्टूकचराईट आदी कंपन्यांच्या उत्पादनांचा समावेश आहे. एक्स्पोला देशातून सहा हजार नागरिक भेट देण्याची शक्यता असून यातून मोठा व्यवसाय मिळणार आहे. यात भेट देणाऱ्या नागरिकांना विविध मशिन्स, देखभालीची उपकरणे आदींची माहिती मिळविता येणार आहे. येथे उपकरणांच्या बुकिंगवर सूट देण्यात येत आहे. एक्स्पोमध्ये नि:शुल्क प्रवेश देण्यात येत असून सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत व्यवसाय, दुपारी २ ते ४ पर्यंत विद्यार्थी आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत इतर भेट देणाऱ्यांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.
.................

Web Title: Grand launch of Industrial Expo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.