हत्येप्र्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला पत्नीसह अटक

By Admin | Updated: May 21, 2014 00:02 IST2014-05-21T00:02:19+5:302014-05-21T00:02:19+5:30

चिमुकलीच्या हत्येप्र्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला पत्नीसह अटक

Gram Panchayat member and wife were arrested in the murder case | हत्येप्र्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला पत्नीसह अटक

हत्येप्र्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला पत्नीसह अटक

मुकलीच्या हत्येप्र्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला पत्नीसह अटक

भोकरदन (जालना) - तालुक्यातील वालसावंगी येथील पायल वाघमारे या सहा महिन्याच्या चिमुकलीची हत्या व लक्ष्मी सोनूने (८) या मुलीच्या अपहरणप्रकरणी पारध पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य विजय भगवान गवळी व त्यांची पत्नी वंदना या दोघांना अटक केली. भोकरदन दिवाणी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस.सी. साराणी यांनी दोघांनाही २४ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वालसांवगी येथे १ लाख ५० हजार रूपयांच्या खंडणीसाठी या दोन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. यातील पायलचा मृतदेह तिच्या घरापासून जवळच गवळी यांच्या घराच्या मागील बाथरुममध्ये सोमवारी आढळला होता. या घटनेनंतर वालसांवगी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पायलच्या आई-वडिलांना ज्या मोबाईलवरून शेवाळे नामक महिलेने संपर्क केला, तो मोबाईल गवळी यांच्या नावे आहे. हा मोबाईल एक महिन्यापूर्वी हरवल्याचे गवळी सांगत आहेत. मात्र त्यांनी त्याबाबतची तक्रार दिली नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील सर्वच मोबाईल शॉपीधारकांना चौकशीसाठी बोलाविले आहे.
लक्ष्मीचा शोध सुरूच
पायलचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांसह गावातील नागरिकांनी लक्ष्मीची शोध मोहीम हाती घेतली. प्रत्येक घराची झडती घेण्यात आली. मात्र अद्याप यश आले नाही. तपासासाठी १९ मे रोजी औरंगाबाद येथील श्वानपथक आले. यातील श्वान वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्या शासकीय निवास्थानाच्या जवळपासच घुटमळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शोधकार्यात या पथकाचाही फारसा उपयोग झाला नाही. लक्ष्मीचा शोध तात्काळ घ्यावा म्हणून तिचे आई - वडील पोलिसांना वारंवार भेटत आहेत.

Web Title: Gram Panchayat member and wife were arrested in the murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.