दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश

By Admin | Updated: June 17, 2015 01:33 IST2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T01:33:08+5:30

Graduation in Class X exam | दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश

दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश

>मिळविलेल्या कोमल गवारेचे कौतुक
बोर्डाच्या विविध पुरस्कारांनी गौरव
बारामती : बारामती येथील कोमल गवारे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ३ विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. तर, पुणे बोर्डामध्ये संस्कृत व गणित या विषयांमध्ये पहिली येण्याचा मानही कोमलने मिळविला आहे. तिला ९८.२० टक्के एवढे गुण मिळाले आहेत. कोमलच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील विद्या प्रतिष्ठानच्या मराठी विद्यालयामध्ये कोमल शिकत आहे. कोमलचे वडील कुंडलिक गवारे हे याच विद्यालयात गणित विषय शिकवतात, तर आई मीरा गवारे या गृहिणी आहेत. गणित विषयामध्ये कोमलला विशेष आवड आहे. या विषयात तिला १०० गुण मिळाले आहेत, तर विज्ञान आणि संस्कृत या विषयांतही तिने १०० गुण मिळविले आहेत. कोमलने पुणे बोर्डातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या बहुतेक पारितोषिकांवर आपला ठसा उमटवला आहे. कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता तिने मिळवलेल्या या यशाची सर्वत्र चर्चा आहे. वाचनाचा छंद असणार्‍या कोमलने रोज चार तास अभ्यास करून परीक्षेची तयारी केली होती. आयआयटीमध्ये अभियंता होण्याचे तिचे स्वप्न आहे.
०००
फोटो ओळी : कोमल गवारे हिचा विद्यालयाच्या प्राचार्या रागिणी तावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१६०६२०१५-बारामती-०६
--------------------
फोटो : कोमल गवारे
१६०६२०१५-बारामती-०७
--------------------
शिल्लक बातमी
०००

Web Title: Graduation in Class X exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.