शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एसपी, कलेक्टरची कॉलर धराल, तर नेते व्हाल; काँग्रेसच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 08:47 IST

वादग्रस्त विधानानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न

रायपूर: राजकीय नेता होण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे छत्तीसगडचे उद्योग मंत्री कवासी लखमा वादात सापडले आहेत. नेता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकाची कॉलर धरा, असं वादग्रस्त विधान लखमा यांनी केलं. लखमा शिक्षक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितला. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुकमा जिल्ह्यातील कोटा मतदारसंघाचे आमदार असलेले कवासी लखमा 5 सप्टेंबरला एका शाळेत कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी एका शाळेत घडलेला प्रसंग सांगितला. 'काही दिवसांपूर्वी मी एका शाळेत कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचेछत्तीसगडचे प्रभारी पी. एल. पुनिया उपस्थित होते. त्यावेळी तिथे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. त्यातल्या एका विद्यार्थ्याला तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, असा प्रश्न मी विचारला. त्यावर मला भविष्यात नेता व्हायचंय, असं उत्तर त्यानं दिलं आणि त्यासाठी काय करावं लागतं, असा प्रश्नदेखील विचारला. पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकाऱ्याची कॉलर पकडशील, तर नेता होशील, असा सल्ला मी त्या विद्यार्थ्याला दिला. माझा हा सल्ला ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेच जण हसू लागले,' असं लखमा यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितलं.  या प्रकरणी लखमा यांच्याशी संपर्क साधला असता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'मी अनेकदा शाळा, आश्रमशाळांना भेटी देतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षांबद्दल प्रश्न विचारतो. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी नेता होण्यासाठी काय करावं लागतं, असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला मी व्यवस्थित अभ्यास करायला हवा, लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरायला हवं. प्रचंड मेहनत करायला हवी, असं उत्तर दिलं. नेता होण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्याची कॉलर धरायला हवा, या विधानात तथ्य नाही,' अशी सारवासारव लखमा यांनी केली. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेस