शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

10 रुपयांत 10 तास चालवा सायकल; 'या' शहरात 10 कोटींचा प्रकल्प सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 10:51 IST

Bicycle : स्थानिक प्रशासन शहरातील बस स्टॉप आणि इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी टप्प्याटप्प्याने सर्वसामान्यांना भाड्याने 3 सायकली उपलब्ध करून देणार आहे.

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये (Indore) वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअंतर्गत 3 हजार सायकली खरेदी करण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी 10 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 'इंदूर पब्लिक सायकल सिस्टम' नावाचा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर चालवला जाईल. सर्वसामान्यांना भाड्याने अत्याधुनिक सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर इंदूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सायकलचा समावेश केल्याने पर्यावरणाचे रक्षण होईल. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल आणि लोकही निरोगी राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

स्थानिक प्रशासन शहरातील बस स्टॉप आणि इतर प्रमुख सार्वजनिक ठिकाणी टप्प्याटप्प्याने सर्वसामान्यांना भाड्याने 3 सायकली उपलब्ध करून देणार आहे. मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने या सायकलचे कुलूप उघडून बंद होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या सायकली जीपीएसने सुसज्ज असतील, जेणेकरून स्थानिक प्रशासनाला त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.

अवघ्या 10 रुपयांत 10 तासांसाठी सायकल याचबरोबर, अवघ्या 10 रुपयांत अशी सायकल सर्वसामान्यांना 10 तासांसाठी उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सायकलचे मासिक भाडे 349 रुपये आहे. दरम्यान, शहरातील सर्वतेब बसस्थानकाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटनही मुख्यमंत्री चौहान यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे करण्यात आले. 7878 चौरस मीटर परिसरात 14.80 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन टर्मिनलमध्ये दररोज 500 बसेस चालवल्या जातील. 79.33 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या दोन जलशुद्धीकरण प्रकल्पांचे भूमिपूजनही चौहान यांच्या हस्ते झाले. ही सुविधा सांडपाण्याचे पाणी पुन्हा वापरण्यायोग्य बनविण्याचे काम करेल.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान