ग्रा.पं. निवडणुकीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार

By Admin | Updated: July 2, 2015 23:47 IST2015-07-02T23:47:28+5:302015-07-02T23:47:28+5:30

ग्रा.पं. निवडणुकीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार

G.P. There will be a need to apply online for elections now | ग्रा.पं. निवडणुकीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार

ग्रा.पं. निवडणुकीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार

रा.पं. निवडणुकीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार
खुलताबाद : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र (अर्ज) आता ऑनलाईन पद्धतीने भरून द्यावे लागणार आहे. त्याच बरोबर ग्रा.पं. निवडणुका या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पद्धतीने घेतल्या जाणार आहे.
याविषयी खुलताबादचे तहसीलदार सचिन घागरे, बालाजी शेवाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया ही जी आहे ती अत्यंत सुलभ पद्धतीने केली असून महाईसेवा, संग्राम केंद्र यांच्याकडे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या साईटवर ऑनलाईन उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) भरून स्वत:चा पासवर्ड स्वत: देऊन लॉगईन करून त्याची प्रिंट काढावी. त्यानंतर ती प्रिंट (पत्र नामनिर्देशनपत्र) निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे (विहित) दिलेल्या ११ ते ४ वेळेत सादर करावे. पूर्वी ग्रा. पं. निवडणुकीसाठी तहसीलदार प्राधिकृत अधिकारी म्हणून काम करायचा. परंतु तोमर विरुद्ध गुजरात राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक हे केंद्रीय निवडणूक आयोगाप्रमाणे सक्षम असून ज्या प्रमाणे लोकसभा विधानसभा निवडणुका घेतल्या जातात त्याच धर्तीवर ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा घ्याव्यात, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आहे. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत कामकाजात मोठा बदल झाला आहे, अशीही माहिती शेवटी सचिन घागरे, बालाजी शेवाळे यांनी दली.

Web Title: G.P. There will be a need to apply online for elections now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.