शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता युनिक आयडी मिळणार, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:56 IST

Farmers : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना विशेष ओळखपत्र (unique ID) देण्याच्या प्रक्रियेत सरकार सातत्याने काम करत आहे. आतापर्यंत 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी 5.5 कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला असून, त्यांना 12 अंकी ओळखपत्र दिले जाणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

या अनोख्या ओळखपत्राच्या मदतीने शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील, असे सरकारचे म्हणणे आहे. याद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकणार आहे. यामुळे त्यांना कोणत्याही मध्यस्थाची गरज भासणार नाही.

केवायएफद्वारे शेतकऱ्यांची पडताळणीओळखपत्र बनवण्याच्या योजनेत ई-नो युवर फार्मर्सद्वारे (ई-केवायएफ) शेतकऱ्यांची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यामुळे विविध योजनांतर्गत लाभ मिळवण्यासाठी विविध विभाग आणि कार्यालयात वारंवार प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. याबाबतची सविस्तर माहिती लोकसभेत मागविण्यात आली होती. यावर नरेंद्र तोमर म्हणाले की, देशातील एकूण 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी साडेपाच कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. उर्वरित काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कल्याण निधी योजनेतून (पीएम-किसान) दरवर्षी दोन हजार रुपयांचे समान हप्ते तीन वेळा दिले जातात, त्या सर्व शेतकऱ्यांना या आयडीचा लाभ मिळेल.

योजनांचा लाभ घेणे होईल सोपे देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासोबतच कृषी क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक सीजनमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. ओळखपत्र बनवल्यानंतर त्यांना या योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. दरम्यान, कृषी योजनांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे होतात, ज्याचा गैरफायदा खोटे व फसवणूक करणारे घेतात. ओळखपत्र तयार झाल्याने अशा लोकांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतीशी संबंधित अनेक प्रकारची माहितीही या माध्यमातून खऱ्या शेतकऱ्यांना देता येईल. डिजिटल कृषी मिशनच्या या प्रयत्नामुळे कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल. 

टॅग्स :Farmerशेतकरी