शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

वाहनचालकांना सरकारकडून दिलासा; FASTag ला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:45 PM

FASTag : यापूर्वी १ जानेवारी २०२१ पासून सर्व राष्ट्रीय टोलनाक्यांवर FASTag द्वारे टोलची रक्कम देणं अनिवार्य करण्याचा घेण्यात आला होता निर्णय

ठळक मुद्देयापूर्वी १ जानेवारीपासून FASTag करण्यात आलं होतं बंधनकारकसध्या ७५ ते ८० टक्के टोलवसूली ही FASTag द्वारे करण्यात येत आहे.

केंद्र सरकारनं जुन्या आणि नव्या सर्वच गाड्यांना आता FASTag अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२१ पासून देशभरात हा नियम लागू होणार होता. परंतु आता सरकारनं वाहनचालकांना दिलासा देत FASTag साठी मुदतवाढ दिली आहे. सरकारनं ही मुदत आता १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयानं सर्व जुन्या गाड्यांनाही FASTag लावणं बंधनकारक केलं आहे. तर दुसरीकडे NHAI नंदेखील १ जानेवारीपासून रोख रकमेद्वारे टोल वसूली बंद केली जाणार असल्याचं म्हटलं म्हटलं होतं. FASTag ला मुदतवाढ मिळाल्यामुले तुर्तास तरी रोख टोल वसूली बंद होण्याची शक्यता नाही. सध्याच्या काळात FASTag द्वारे ७५ ते ८० टक्के टोलवसूली केली जाते.हायवे ऑथोरिटी १५ फेब्रुवारीपासून १०० टक्के कॅसलेस टोलवसूलीसाठी आवश्यक ते नियम तयार करू शकते असं एनएचएआयशी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्रालयानं सांगितलं. टोल नाक्यांवरील गाड्यांच्या रांगा कमी करण्यासाठी तसंच डिजिटल ट्रान्झॅक्शनला चालना देण्यासाठी FASTag चा वापर वाढवण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. FASTag नसलेल्या गाड्यांनी या लेनमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्याकडून मूळ टोलच्या रकमेच्या दुप्पट टोल वसूल करण्यात येईल. काय आहे FASTag?FASTag हा स्टिकर गाड्यांच्या समोरील काचेवर लावण्यात येतो. महामार्गावर टोल नाक्याजवळ गाडी आल्यानंतर स्कॅनर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानाद्वारे तो स्टिकर स्कॅन करतो. यामुळे टोल नाक्यांवर गाडी थांबवण्याची आवश्यकता भासत नाही.कसा घ्याल FASTag ?कार, ट्रक, बस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या खासगी आणि कमर्शिअल वाहनांना टोल नाक्यांवरून पुढे जाण्यासाठी FASTag आवश्यक असणार आहे. वाहन चालकांकडे FASTag खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. देशभरातील कोणत्याही टोल नाक्यांवरून वाहन चालकांना FASTag खरेदी करता येऊ शकतो. त्यासाठी केवळ चालकांना आपल्या गाडीच्या नोंदणीची कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. FASTag खरेदी करण्यासाठी ही केव्हायसी प्रक्रिया आहे. तर दुसरीकडे FASTag हा तुमच्या बँकेद्वारे, अॅमेझॉन, पेटीएम, एअरटेल पेमेंट बँकसारख्या ठिकाणांहूनही खरेदी करता येणार आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस या बँकांमधूनही FASTag खरेदी करता येऊ शकतो.काय असेल किंमत ?FASTag ची किंमत ही दोन बाबींवर अवलंबून आहे. पहिली म्हणजे तुमचं वाहन हे कोणत्या श्रेणीतील आहे आणि दुसरी बाब म्हणजे तुम्ही FASTag कुठून विकत घेत आहात. प्रत्येक बँकेची FASTag साठी सिक्युरिटी डिपॉझिटसाठी निरनिराळी पॉलिसी आहे. जर तुम्ही पेटीएमवरून FASTag खरेदी करत असाल तर तो तुम्हाला ५०० रूपयांना मिळेल. यामधअये २५० रूपयांचं रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट आणि १५० रूपयांचा बॅलन्स देण्यात येतो. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेतून FASTag खरेदी केला तर त्यासाठी ९९ रूपयांची इश्यू फी आणि २०० रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावं लागतं. 

कसं कराल रिचार्ज?FASTag रिचार्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे ज्या बँकेतून तुम्ही ते घेतलं आहे त्याद्वारे तयार करण्यात आलेलं FASTag वॉलेट डाऊनलोड करा आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ते रिचार्ज करा. तर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही पेटीएम, फोन पे सारख्या मोबाईल वॉलेटद्वारेही FASTag रिचार्ज करू शकता. तसंच अॅमेझॉन पे आणि गुगल पे वरही हा पर्याय उपलब्ध आहे. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाdigitalडिजिटलcarकार