TikTok आणि Helo अ‍ॅप होणार बंद?, सरकारने पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:25 PM2019-07-18T16:25:42+5:302019-07-18T16:27:19+5:30

टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे.

Govt concerned TikTok, Helo used for anti-India and illegal activities, may ban them | TikTok आणि Helo अ‍ॅप होणार बंद?, सरकारने पाठवली नोटीस

TikTok आणि Helo अ‍ॅप होणार बंद?, सरकारने पाठवली नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देटिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे. स्वदेशी जागरण मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिकटॉक आणि हॅलोसारख्या सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी यासाठी एक पत्र लिहिलं आहे.

नवी दिल्ली - टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांना 21 प्रश्न विचारण्यात आले आहेत. जर या प्रश्नांना योग्य उत्तरं मिळाली नाहीत तर टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येऊ शकते. 

स्वदेशी जागरण मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिकटॉक आणि हॅलोसारख्या सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी यासाठी एक पत्र लिहिलं आहे. हे दोन्ही अ‍ॅप राष्ट्राच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. समाजाला यापासून धोका असल्याने या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. याआधी टिकटॉकच्या माध्यमातून आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत टिकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती.  तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुगल आणि अ‍ॅपला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अ‍ॅप हटविण्यास सांगितले होते. 

मद्रास हायकोर्टाने टिकटॉक अ‍ॅपवर घातलेल्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली होती. मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला याबाबत निर्देश देऊन टिकटॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याची सूचना केली होती त्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून गुगल आणि अ‍ॅपलला टिकटॉक अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र यानंतर टिकटॉक अ‍ॅपवर घातलेली बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रसिद्धीसाठी अनेक जण विविध विषयांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणं काही दिवसांपूर्वी पाच तरुणांच्या अंगलट आलं होतं.  मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा या व्हिडीओमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. टीम 07 या नावाने त्यांनी व्हिडीओ अपलोड केला होता. कमी वेळात हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. या तरुणांच्या फॉलोअर्सची संख्याही खूप जास्त आहे. 'तबरेजला तर तुम्ही मारुन टाकलं मात्र भविष्यात त्याच्या मुलाने याचा बदला घेतल्यास मुसलमान दहशतवादी असतो असं म्हणू नका' असा वादग्रस्त मजकूर या टिक टॉकच्या या व्हिडिओत आहे. याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली. 

 

Web Title: Govt concerned TikTok, Helo used for anti-India and illegal activities, may ban them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.