गोविंदाचार्यांनी केली मोदी सरकारवर टीका
By Admin | Updated: May 12, 2015 23:39 IST2015-05-12T23:39:05+5:302015-05-12T23:39:05+5:30
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे एक वर्षाचे कामकाज जनतेच्या आशा-आकाक्षांच्या पूर्ततेच्या दृष्टीने निराशाजनक राहिले, अशी टीका राष्ट्रीय

गोविंदाचार्यांनी केली मोदी सरकारवर टीका
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे एक वर्षाचे कामकाज जनतेच्या आशा-आकाक्षांच्या पूर्ततेच्या दृष्टीने निराशाजनक राहिले, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक के. एन. गोविंदाचार्य यांनी मंगळवारी येथे केली.
अद्याप सरकारची दिशा व धोरण स्पष्ट झाले नसून देशातील ग्रामीण आणि गरीब जनतेसाठी ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत, असाही टोला त्यांनी लगावला. गोविंदाचार्य यांनी येथे पत्रकारांशी बोलताना उपरोक्त मत मांडले. यावेळी त्यांनी सरकारशी संबंधित विविध विषयांवर मते मांडली. (लोकमत न्यूज नेटवर्क)