वीरेंद्र तावडेच्या हजर अर्जावर आज सुनावणी गोविंद पानसरे हत्या प्रकरण
By Admin | Updated: January 3, 2017 20:06 IST2017-01-03T20:06:21+5:302017-01-03T20:06:21+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या हजर अर्जावर आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणीवेळी निर्णय होणार आहे. दरम्यान, पानसरे हत्याप्रकरणातील सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक असलेला संशयित समीर गायकवाड याच्या दोषारोपपत्र (चार्जशीट) निश्चितीवरही सुनावणी होणार आहे.

वीरेंद्र तावडेच्या हजर अर्जावर आज सुनावणी गोविंद पानसरे हत्या प्रकरण
क ल्हापूर : ज्येष्ठ नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या हजर अर्जावर आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणीवेळी निर्णय होणार आहे. दरम्यान, पानसरे हत्याप्रकरणातील सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक असलेला संशयित समीर गायकवाड याच्या दोषारोपपत्र (चार्जशीट) निश्चितीवरही सुनावणी होणार आहे.पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हा आहे. दि. ६ डिसेंबर २०१६ ला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तावडेचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या दोषारोपपत्रातील माहिती तावडेला सांगण्यासाठी व हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग करावा, यासाठी त्याला हजर करण्याचा अर्ज तावडेचे वकील ॲड. समीर पटवर्धन यांनी यापूर्वी दाखल केला आहे; परंतु, न्यायालयाने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. २२ डिसंेबर २०१६ ला जिल्हा न्यायाधीश क्रमांक ९ एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी झाली होती.============गणेश