कर्नाटक व त्रिपुराचे राज्यपाल आज सेवानिवृत्त
By Admin | Updated: June 28, 2014 01:32 IST2014-06-28T01:32:34+5:302014-06-28T01:32:34+5:30
कर्नाटकचे राज्यपाल एच.आर. भारद्वाज व त्रिपुराचे राज्यपाल देवानंद कोनवार हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत.

कर्नाटक व त्रिपुराचे राज्यपाल आज सेवानिवृत्त
>नवी दिल्ली : कर्नाटकचे राज्यपाल एच.आर. भारद्वाज व त्रिपुराचे राज्यपाल देवानंद कोनवार हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत. या दोन्ही राज्यांची अतिरिक्त जबाबदारी अनुक्रमे तामिळनाडू व मिझोरमच्या राज्यपालांकडे सोपविण्यात आली आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडीत कायदामंत्री म्हणून काम पाहिलेले 77 वर्षाच्या भारद्वाज यांनी 2क्क्9 मध्ये कर्नाटकच्या राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती. येथे नवे राज्यपाल नियुक्त होईर्पयत तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या कर्नाटकची जबाबदारी सांभाळतील.
आसामचे माजी मंत्री असलेले 71 वर्षाचे कोनवार हे 2क्क्9 मध्ये बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर 2क्13 मध्ये त्यांना त्रिपुराचे राज्यपालपद देण्यात आले.
मिझोरमचे राज्यपाल वक्कम बी. पुरुषोत्तम यांच्याकडे सध्या त्रिपुराची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. याचसोबत मेघालयाचे राज्यपाल के. के. पॉल हे नागालँडच्या राज्यपालांचीही अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार आहेत. सध्या या पाचही राज्यांमधील राज्यपालपदे रिक्त आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)