गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा शपथविधी
By Admin | Updated: August 31, 2014 23:35 IST2014-08-31T23:35:39+5:302014-08-31T23:35:39+5:30
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रसिद्ध लेखिका मृदुला सिन्हा यांनी रविवारी गोव्याच्या नव्या राज्यपालपदाची शपथ ग्रहण केली.

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा शपथविधी
पणजी : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रसिद्ध लेखिका मृदुला सिन्हा यांनी रविवारी गोव्याच्या नव्या राज्यपालपदाची शपथ ग्रहण केली. बी. व्ही. वांचू यांच्या राजीनाम्यामुळे सिन्हा यांची गोव्याचे नव्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पणजीतील राजभवन येथे आयोजित एका साध्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांनी सिन्हा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.