बिहारमधील राजकीय संकटासाठी राज्यपाल आणि भाजप जबाबदार
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:25+5:302015-02-15T22:36:25+5:30
जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम

बिहारमधील राजकीय संकटासाठी राज्यपाल आणि भाजप जबाबदार
ज यू, मित्र पक्षांची एकजूट कायम पाटणा : जितनराम मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २० फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याआधी संयुक्त जनता दल आणि मित्र पक्षांनी आपल्या एकजूटतेचे प्रदर्शन करीत बिहारमधील राजकीय अस्थिरतेसाठी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. बिहारला संकट आणि राजकीय अस्थिरतेत ढकलण्यात आले आहे. राज्यपालांनी भाजपच्या निर्देशावरून मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्तीचा वेळ दिला आहे, असा आरोप जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी केला.मुख्यमंत्री मांझी हे एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय घोषणा करीत असल्याने राज्यात अराजक आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा सरकारी तिजोरीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. आपण औटघटकेचे मुख्यमंत्री आहोत, हे ठाऊक असतानाही मांझी अनेक घोषणा करीत आहेत. राज्यपालांनी त्यांना अशा घोषणा करण्यापासून रोखले पाहिजे, असे सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)-------मांझी बहुमत सिद्ध करणारच -यादवमांझी यांना जदयूच्या किमान ४० आमदारांचा पाठिंबा आहे आणि ते २० फेब्रुवारीलाआपले बहुमत सिद्ध करतील, असा दावा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचे बंधू आणि माजी खासदार अनिरुद्ध प्रसाद ऊर्फ साधू यादव यांनी केला आहे.पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले की, माजी मंत्री विजयकुमार चौधरी यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी करून नितीशकुमार यांनी एक प्रकारे आपला पराभव स्वीकार केला आहे आणि मांझी यांना मुख्यमंत्री मानलेले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्याच पक्षाच्या चौधरी यांना पुढे केल्यामुळे नितीशकुमार यांनी आपल्याकडे बहुमत असल्याच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. यावेळी जदयूचे बंडखोर आमदार रवींद्र राय हे साधू यादव यांच्या सोबत होते.