शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

रोजगाराचे वास्तव चित्र मांडणार सरकार, जनतेसमोर वस्तुस्तिथी ठेवणार; तयार करणार योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:06 IST

श्रम मंत्रालयाच्या सूत्रांनुसार मंत्रालयाची सांख्यिकी शाखा यासाठी पाहणी करील. या पाहणीत बाजारात रोजगाराचे वास्तव चित्र समजून घेता येईल व देशासमोर खरेखुरे चित्र मांडता येईल. यामुळे रोजगाराची संधी निर्माण करणे सोपे जाईल व अशा योजना योग्यरीत्या लागू केल्या जातील.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : मोदी सरकार आव्हान बनलेल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे प्रत्यक्षातील चित्र जनतेसमोर ठेवणार आहे. यासाठी सरकार प्रत्येक प्रकारच्या रोजगाराशी संबंधित संख्या जनतेसमोर ठेवेल. या आकड्यांच्या माध्यमातून सरकार श्रमांना भांडवलासारखे उत्पादनातील महत्त्वाचा घटक म्हणून मांडेल.

श्रम मंत्रालयाच्या सूत्रांनुसार मंत्रालयाची सांख्यिकी शाखा यासाठी पाहणी करील. या पाहणीत बाजारात रोजगाराचे वास्तव चित्र समजून घेता येईल व देशासमोर खरेखुरे चित्र मांडता येईल. यामुळे रोजगाराची संधी निर्माण करणे सोपे जाईल व अशा योजना योग्यरीत्या लागू केल्या जातील.

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की, केंद्र व राज्य सरकारशिवाय मोठ्या संख्येने डॉक्टर, वकील, सीए, आर्किटेक्ट आदी व्यावसायिक रोजगारनिमिर्तीत महत्त्वाची भूमिका बजावतात; परंतु त्यांची आकडेवारी समोर येत नाही. रोजगाराचे वास्तव चित्र मांडताना या आकडेवारीचा विस्ताराने उपयोग केला जाईल. 

सरकारचे म्हणणे आहे की, जनतेसमोर रोजगाराचे वास्तविक चित्र येत नाही व त्यामुळे अनेक वेळा विरोधी पक्ष त्यांच्या लाभासाठी भ्रामक स्थिती निर्माण करतात.

रोजगार संधी वाढवण्याचा प्रयत्न - मंत्रालयाच्या सूत्रांनुसार कोलकाता विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्रोफेसर एस.पी. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली ही आकडेवारी गोळा करण्यासाठी समिती स्थापन केली गेली आहे. समिती बाजारात रोजगाराच्या अवस्थेची आकडेवारी गोळा करण्यासाठी नमुने गोळा करून योजना बनवील व आकड्यांच्या विश्लेषणाला तपासून अंतिम रूप देईल.

- मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, कोरोना लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी वेगाने वाढली; परंतु अनलॉकनंंतर सुधारण्याचा वेग बराच कमी आहे. सरकार उद्योगजगताला दिलासा देण्यासाठी दोन पॅकेजच्या माध्यमातून रोजगार संधी वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. पॅकेजची घाेषणा लवकरच केली जाईल, अशी आशा आहे. 

टॅग्स :Governmentसरकार