शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींना दंड करण्याचा मूर्खपणा सरकार करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 04:33 IST

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर आक्षेप घेण्याची प. बंगाल सरकारची भूमिका अगदी न्याय्य आहे.

कोलकाता : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी (एनपीआर) विचारली जाणारी माहिती अनुचित आहे, अशा ठाम समजुतीने देशातील कोट्यवधी नागरिकांनी ती माहिती देण्यास नकार दिला तर त्या सर्वांना दंडित करण्याचा मूर्खपणा मोदी सरकार करणार नाही, अशी अपेक्षा आहे, असा उपरोधिक टोला ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी शनिवारी येथे मारला.सुधारित नागरिकत्व कायद्याच्या संदर्भात नेमकी कोणती भूमिका घ्यावी याचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेले चिदम्बरम पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर आक्षेप घेण्याची प. बंगाल सरकारची भूमिका अगदी न्याय्य आहे. यावरून निर्माण होणारी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती, लोकांचा असलेला व्यापक विरोध, हे काम करण्यात राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची अनुत्सुकता व माहिती देण्यास तयार नसलेल्या लोकांनी घरे बंद करून घेण्याचे त्यांना येणार हे अनुभव या सर्वाचे दाखल देऊन हा कायदा राबविणयस राज्याने विरोध करण्यात काहीच गैर नाही.जनगणना व ‘एनपीआर’च्या कामात सहकार्य मिळविण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक बोलाविली होती. प. बंगालचे प्रतिनिधी बैठकीला गेले नाहीत. मात्र काँग्रेसशासित राज्यांचे प्रतिनिधी गेले होते. यावरून विरोधकांमध्ये फाटाफूट पडल्याचे चित्र दिसते, असे वाटत नाही का, असे विचारता चिदम्बरम महणाले की, बैठकीला जाणे याचा अर्थ तो कायदा मान्य करणे असे नाही. केंद्राने बैठक बोलावल्यावर राज्यांनी आपले प्रतिनिधी पाठविणे व दोन्ही बाजूंनी परस्परांची मते व विचार समजावून घेणे ही योग्य पद्धत आहे. अनेक राज्यांच्या मुख्य सचिवांनी या कायद्यातील त्रुटी बैठकीत मांडल्या.एनपीआरसाठी माहिती गोळा करणारजनगणनेसाठी प्रगणक १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात घरोघरी जातील तेव्हा ते ‘एनपीआर’साठीही माहिती गोळा करणार आहेत. जे कोणी याला सहकार्य करणार नाहीत त्यांना दंडित करण्याची कायद्यात काही तरतूद आहे का, असे विचारता चिदम्बरम म्हणाले की, तसे होणार नाही, अशी अपेक्षा आहे. दंडित करायचे म्हटल्यास कोट्यवधी लोकांना करावे लागेल. असा मूर्खपणा मोदी सरकार करेल, असे वाटत नाही.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा