२0 लाख लोकांना सरकार देणार रोजगार; केंद्र व राज्यांतील पदे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 06:14 AM2017-09-29T06:14:02+5:302017-09-29T06:14:02+5:30

केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे. त्यातील २ लाखांहून अधिक पदे रेल्वेतील असून, ती भरण्याची घोषणा आधीच झाली आहे.

Government will give jobs to 20 lakh people; Center and states will fill the posts | २0 लाख लोकांना सरकार देणार रोजगार; केंद्र व राज्यांतील पदे भरणार

२0 लाख लोकांना सरकार देणार रोजगार; केंद्र व राज्यांतील पदे भरणार

नवी दिल्ली : देशात वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावरून विरोधकांनी टीका सुरू केल्यामुळे मोदी सरकारने जोरात हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे. त्यातील २ लाखांहून अधिक पदे रेल्वेतील असून, ती भरण्याची घोषणा आधीच झाली आहे. या मेगाभरतीची सुरुवात केंद्राची विविध खाती व सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने या मेगाभरतीसाठी पुढाकार घेतला आहे. कामगार मंत्रालय सध्या विविध खात्यांमध्ये असलेल्या रिकाम्या पदांची माहिती घेत आहे. ती मिळाल्यानंतर नव्या योजनेचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्त्वावर ही पदे भरण्यात येतील, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाºयाने दिली.
प्रशासनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र तसेच अनेक राज्यांनी नोकरभरती थांबवली होती. त्यामुळे अनेक पदे बºयाच वर्षांपासून रिक्त आहेत. पण येत्या काही महिन्यांत हे चित्र बदलेल, असे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्येच सध्या ६ लाखांहून अधिक जागा रिकाम्या आहेत.
केंद्रीय पातळीवर ही योजना यशस्वी झाल्यास राज्यांच्या पातळीवरदेखील ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे अधिकाºयाने सांगितले.
या मेगाभरतीद्वारे सुमारे २० लाख युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाकडून लवकरच सर्व खात्यांकडून तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.

निवडणुका जवळ आल्यामुळे..?
नरेंद्र मोदी यांनी २0१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात, आम्ही सत्तेवर आल्यास दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ , असे आश्वासन दिले होते.
पण प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत तेवढे रोजगार निर्माण होणे सोडूनच द्या, पण अनेक जणांचा असलेला रोजगारच हिरावून घेतला गेला.
खासगी उद्योगांमध्ये तर रोजगारनिर्मिती तर थांबल्यातच जमा आहे. त्यामुळे रोजगाराच्या प्रश्नावरून केंद्र सरकार व विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. म्हणून लोकसभा निवडणुका दोन वर्षांवर आल्या असताना हे पाऊ ल उचलण्यात येत आहे.

6,00000 अधिक जागा केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्येच रिकाम्या...

Web Title: Government will give jobs to 20 lakh people; Center and states will fill the posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार