शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीसारख्या रांगा देशात पुन्हा लागाव्यात हीच सरकारची इच्छा- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 23:26 IST

गरीब, मोलमजुरी करणारे 30-35 वर्षे जुनी कागदपत्रं कुठून आणणार; प्रियंका गांधींचा सवाल

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण पेटलं आहे. अनेक राज्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय पक्षदेखील सक्रीय झाले आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी नव्या कायद्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधींनी इंडिया गेट परिसरात दाखल होत आंदोलनात सहभागी नोंदवत मोदी सरकारवर तोफ डागली. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी गरिबांच्या विरोधात आहे. देशातील गरीब जनतेला नव्या कायद्यांचा सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत मोलमजुरांनी काय करायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनता ३०-३५ वर्ष जुनी कागदपत्रं कशी दाखवणार? मोदी सरकार देशाला कोणती परिस्थिती निर्माण करू पाहात आहे?, असे प्रश्न त्यांनी विचारले. नोटबंदीवेळी देशातील जनता रांगेत उभी राहिली होती. आताही त्याचप्रकारे देश रांगेत उभा राहावा, असं सरकारला वाटतं, अशा शब्दांत प्रियंका गांधींनी केंद्राला लक्ष्य केलं. नव्या कायद्यांचा फटका केवळ गरिबांना बसेल, असं प्रियंका म्हणाल्या. श्रीमंत माणसं त्यांच्याकडे असणारा पासपोर्ट दाखवतील. मात्र गरीब, मोलमजुरी करुन जगणारे काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नव्या कायद्याविरोधातलं आंदोलन शांततेच्या मार्गानंच सुरू ठेवा, असं आवाहनदेखील यावेळी त्यांनी आंदोलकांना केलं. प्रियंका यांच्या आधी सोनिया गांधींनीदेखील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून केला.भाजपाचं सरकार देशभरातील विद्यार्थी आणि जनतेकडून करण्यात येत असलेलं आंदोलन ज्या प्रकारे दाबत आहे, ते पाहून काँग्रेस पक्ष चिंतीत झाला आहे. देशभरातील विद्यापीठं, आयआयटी, आयआयएम आणि अन्य आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी भाजपा सरकारच्या फुटिरतावादी आणि लोकविरोधी धोरणांविरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलनं करत आहेत. लोकशाहीमध्ये चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवण्याचा आणि चिंता व्यक्त करण्याचा नागरिकांना हक्क आहे. लोकांचं म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मनातील शंकांचं निरसन करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं सोनिया गांधी भाजपा सरकारवर बरसल्या. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधीDemonetisationनिश्चलनीकरण