संपूर्ण कर्जमाफीसाठी शासनाला भाग पाडू -

By Admin | Updated: February 17, 2016 00:24 IST2016-02-17T00:24:54+5:302016-02-17T00:24:54+5:30

चोपडा : शासनाला शेतकर्‍यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू. वेळ पडल्यास विधानसभेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिला.

The government should part with full debt waiver - | संपूर्ण कर्जमाफीसाठी शासनाला भाग पाडू -

संपूर्ण कर्जमाफीसाठी शासनाला भाग पाडू -

पडा : शासनाला शेतकर्‍यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू. वेळ पडल्यास विधानसभेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिला.
............................................


सिंचनासंदर्भात शिरपूर पॅटर्नची पहाणी करण्यासाठी जात असतांना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता चोपडा येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, गोपाळ पाटील आदी यावेळी हजर होते.
कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठीच केळी उत्पादक महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. याचा केळी उत्पादकांना भाव वाढीसाठी कुठलाही फायदा होणार नाही, असे सांगून त्यांनी विद्यमान युती शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. दीड वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिक, शेतकर्‍यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. शेतकर्‍यांच्या बाबतीत शासन उदासीन असल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज असतांना, त्यास सरकार प्रतिसाद देत नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.
.......................

Web Title: The government should part with full debt waiver -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.