सरकारी अधिकाऱ्यांना जंगम मालमत्तेचा परतावा भरण्याची सूचना
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:18+5:302015-01-23T23:06:18+5:30
नवी दिल्ली-भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व वनविभाग सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या जंगम मालमत्तेचा परतावा या महिनाअखेर दाखल करण्याची सूचना सरकारने दिली आहे. हा परतावा त्यांच्या या वर्षाच्या एप्रिलपर्यंत नव्या नियमानुसार जमा करावयाच्या परताव्याव्यतिरिक्तचा राहणार आहे.

सरकारी अधिकाऱ्यांना जंगम मालमत्तेचा परतावा भरण्याची सूचना
न ी दिल्ली-भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व वनविभाग सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या जंगम मालमत्तेचा परतावा या महिनाअखेर दाखल करण्याची सूचना सरकारने दिली आहे. हा परतावा त्यांच्या या वर्षाच्या एप्रिलपर्यंत नव्या नियमानुसार जमा करावयाच्या परताव्याव्यतिरिक्तचा राहणार आहे.कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) दिलेल्या आदेशानुसार, सरकारने आपल्या संबंधित खात्यांमधील सर्व अधिकाऱ्यांना तसे कळविले आहे. १ जानेवारी २०१५ पर्यंतची स्थिती दाखविणारा परतावा ३१ जानेवारी २०१५ च्या आधी जमा केला जावा असेही त्यात नमूद केले आहे.