गोव्यात सरकारी नोक:यांचे रॅकेट!
By Admin | Updated: September 16, 2014 02:31 IST2014-09-16T02:31:24+5:302014-09-16T02:31:24+5:30
‘नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर’मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणारे एक भले मोठे रॅकेट उघड झाले आह़े

गोव्यात सरकारी नोक:यांचे रॅकेट!
प्रवीण पाटील - पणजी
‘नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर’मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणारे एक भले मोठे रॅकेट उघड झाले आह़े महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या संयुक्त उपक्रमातून संजीवनी आरोग्य योजनेअंतर्गत हे कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याचा बनाव करून त्यासाठी ‘टेलिफोन ऑपरेटर’ हवे आहेत, अशी जाहिरात फसवेगिरी करणा:यांनी देऊन अनेक तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आह़े
अमोल महापुरे (ऐतवडे-खुर्द, जि़ सांगली), अमोल सुरडकर, शरद पवार (पद्मावती, जि़ जालना) यांना कॉल सेंटरचे नियुक्तिपत्रही दिले आह़े या तिघांनी गोवा आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ़ जुङो. ओ़ ए़ डिसा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारचा कोणताही उपक्रम गोवा सरकार राबवीत नसल्याचे सांगितल़े त्याचप्रमाणो महाराष्ट्र आरोग्य विभागाचे संचालक डॉ़ सतीश पवार यांनीही महाराष्ट्र सरकार कोणतेही कॉल सेंटर चालवत नसल्याचे स्पष्ट केले.
2 ऑगस्टला जाहिरात वाचून त्यावरील मोबाईल क्रमांकावर नाव, पत्ता व शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती पाठवली़ 6 ऑगस्टला एका महिलेने फोन करून सामान्य ज्ञानावर आधारित दहा प्रश्न विचारल़े त्यानंतर 8 ऑगस्टला दुस:या क्रमांकावरून पुन्हा फोन करून काही प्रश्न विचारल़े प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ‘काय जॉब आहे ? काय करावे लागेल,’ अशी विचारणा केली़ त्यावर तुम्हाला लवकरच आम्ही सर्व माहिती पाठवू, असे सांगण्यात आल्याचे
अमोल सुरडकर व शरद पवार यांनी सांगितले.
काही दिवसांनी वेगवेगळ्या तारखांना त्या तिघांनाही पोस्टाने रजिस्टर एडी केलेले एक पाकीट आल़े त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘संजीवनी आरोग्य योजना’चे मराठी कॉल सेंटर असे ठसठशीत अक्षरांत लिहिलेले पत्र मिळाले.
नियुक्तिपत्रवरील क्रमांकावर संपर्क साधून भारतीय स्टेट बँकेच्या संबंधित खात्यावर अमोल यास 11 हजार तर अमोल व शरद यांना प्रत्येकी 8 हजार रुपये भरण्यास सांगितल़े सरकारी नोकरीसाठी पैसे का भरायचे, असा प्रश्न पडल्याने तिघांनीही गोव्यातील पत्त्याची चौकशी केली असता पत्ता चुकीचा असल्याचे समजल़े
च्गोवा सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना अथवा कॉल सेंटर चालविण्यात येत नाही़ तरुणांनी यापासून सावध राहण्याची गरज आह़े नियुक्तिपत्रे मिळालेल्या तरुणांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे गोव्याच्या आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ़ जुङो़ ओ़ ए़ डिसा म्हणाले.
च्महाराष्ट्र आरोग्य विभागाची ‘संजीवनी आरोग्य योजना’च अस्तित्वात नाही़ तसेच ‘नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर’ही नाही, अशी माहिती मुंबईतील आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ़ सतीश पवार यांनी दिली.
च्महाराष्ट्र शासनाची ‘नवसंजीवनी आरोग्य योजना’ आह़े त्याद्वारे आदिवासींसाठी योजना राबविण्यात येतात. नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर असा कोणताही उपक्रम नाही़, अशी प्रतिक्रिया नवसंजीवनी आरोग्य योजनेचे आरोग्य अधिकारी डॉ़ नंदकुमार देशमुख यांनी दिली.