शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शाळांत नर्सरी सुरू करणार , पूर्वप्राथमिक शिक्षणावर सरकारचे विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:32 IST

देशभरातील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यापूर्वी किती आणि कसा अभ्यास करावा याबाबत सरकार मंथन करत असून, सरकारी शाळांमध्येही नर्सरी वर्ग सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : देशभरातील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यापूर्वी किती आणि कसा अभ्यास करावा याबाबत सरकार मंथन करत असून, सरकारी शाळांमध्येही नर्सरी वर्ग सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.मुलांच्या मनात अभ्यासाबाबत असणारी भीती आणि दडपण कमी करण्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. याअंतर्गत शाळा आणि माध्यमिक स्तरावर शिक्षणात बदल करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. दरम्यान, प्ले स्कूलच्या गळेकापू स्पर्धेपासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी सर्व सरकारी शाळात नर्सरी, प्ले स्कूल सुरु करावेत असाही प्रस्ताव आहे.एका अधिकाºयाने सांगितलेकी, यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाऊ शकते. सरकार यावर विचार करत आहे की, ज्या प्रकारे प्ले-स्कूल एक व्यवसाय होत चालला असताना यामुळेविद्यार्थ्यांच्या मानसिक विकासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ नये.प्ले स्कूलने स्पर्धेतून मुलांना अनावश्यक पुस्तके, अ‍ॅक्टिव्हिटी किंवा खेळाचे अनावश्यक ओझे लादू नये. अशावेळी मानसशास्त्रातील तज्ज्ञ, समुपदेशक आणि शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासोबत सरकार यावर विचारविनिमय करणार आहे. शाळेत जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी नेमका कशाचा अभ्यास करावा याची माहितीही सरकार घेऊ इच्छिते.एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, प्ले स्कूलच्या गळेकापू स्पर्धेपासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी सर्व सरकारी शाळात नर्सरी, प्ले स्कूल सुरु करावेत असाही प्रस्ताव आहे. राज्य सरकारांना प्रेरित करण्यात यावे की, किमान मोठ्या शहरात राज्य सरकारने आपल्या प्राथमिक विद्यालयात नर्सरी वर्ग सुरु करावेत.जेथे शक्य असेल तेथे असे स्कूल सुरु करावेत. गरज भासल्यास यात एनजीओ आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाºया संस्थांची मदत घ्यावी.

टॅग्स :SchoolशाळाIndiaभारतGovernmentसरकार