शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

अचानक कुठे गेल्या ATM मधल्या नोटा?; अर्थमंत्री जेटलींनी सांगितलं कशा फुटल्या वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 13:10 IST

नोटांच्या तुटवड्यावर जेटलींचं स्पष्टीकरण

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर एटीएममध्ये जसा खडखडाट झाला होता, तसंच चित्र देशाच्या अनेक भागांत दिसू लागल्यानं आश्चर्य आणि चिंता व्यक्त होतेय. एटीएममधल्या नोटा गेल्या कुठे?, असा प्रश्न विचारला जातोय. परंतु, या चलनचणचणीमागे कुठलाही गडबड-घोटाळा नसल्याचा खुलासा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या रोख रकमेचा तुटवडा जाणवतो आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. 'देशातील काही भागांमध्ये रोख रकमेची मागणी जास्त असल्यानं इतर भागांमध्ये चणचण जाणवी लागली आहे. देशातील बाजारात सध्या गरजेपेक्षा जास्त रक्कम उपलब्ध आहे,' असं जेटलींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री प्रसाद शुक्ल यांनी नोटांचा तुटवडा तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल, अशी माहिती दिली. 'काही भागांमध्ये नोटांची चणचण जाणवत आहे. नोटांचा तुटवडा असलेल्या भागांमध्ये लवकरच चलन पुरवठा केला जाईल,' असं शुक्ल यांनी सांगितलं. 'सध्याच्या घडीला आमच्याकडे 1 लाख 25 हजार कोटी रुपयांची रोकड आहे. काही राज्यांमध्ये जास्त रोकड असल्यानं समतोल बिघडला आहे. त्यामुळेच सरकारनं राज्य स्तरावर एक समिती स्थापना केली आहे,' अशी माहितीही त्यांनी दिली. नोटांची कमतरता असलेल्या भागांमध्ये तीन दिवसांमध्ये नोटांचा पुरवठा केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यापासून रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रोकड नेमकी गेली कुठे?, असा प्रश्न लोकांना पडला आहे. दोन हजारांच्या नोटादेखील बाजारातून अचानक गायब झाल्यानं पुन्हा एकदा साठेबाजी सुरू झाली का, असा संशयदेखील व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीदेखील याबद्दल शंका उपस्थित करत यामागे कटकारस्थान असल्याची शक्यता वर्तवली आहेत. 

टॅग्स :atmएटीएमArun Jaitleyअरूण जेटली