पद्म पुरस्काराबद्दलचे वृत्त सरकारने फेटाळले
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:21+5:302015-01-23T23:06:21+5:30
नवी दिल्ली : यावर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त तर्कवितर्कांवर आधारले असल्याचे सांगत सरकारने त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पद्म पुरस्काराबद्दलचे वृत्त सरकारने फेटाळले
न ी दिल्ली : यावर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त तर्कवितर्कांवर आधारले असल्याचे सांगत सरकारने त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.सरकारने अद्याप २०१५ या वर्षासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली नाही. दरवर्षी गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला नावे जाहीर केली जातात. प्रसिद्धी माध्यमांमध्ये आलेली नावे केवळ तर्कवितर्कांवर आधारित असून त्याला अधिकृतरीत्या दुजोरा देण्यात आलेला नाही, असे गृह मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव बाबा, आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश असल्याचे काही वृत्तांमध्ये म्हटले होते.