शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण रोखण्यास सरकार-अधिकारी निष्क्रिय, कोर्टाने सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 09:10 IST

दिल्लीतील प्रदूषणप्रकरणी सुप्रीम कोर्टाने तज्ज्ञांनाही सुनावले खडे बोल

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे किती वाहने आहेत, त्यातले किती अधिकारी रोज कार्यालयात येतात याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारली.

नवी दिल्ली :  दिल्लीमध्ये प्रचंड वाढलेले प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी केंद्र व संबंधित राज्य सरकारे प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाहीत. सरकारी अधिकारी निष्क्रिय झाले आहेत अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. दिल्लीतील प्रदूषणाबाबत टीव्हीवर तज्ज्ञांच्या ज्या चर्चा होतात त्यामुळेच वातावरण अधिक प्रदूषित होत आहे असाही टोला न्यायालयाने लगावला.

सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना काहीही करायची इच्छा नाही. ते निष्क्रिय झाले आहेत. थातुरमातुर उपाययोजना करण्यातच त्यांना अधिक रस आहे. दिल्लीत वाहनांमुळे प्रचंड प्रदूषण वाढले असे सरकार म्हणते. तरीही या शहरात वाढत्या संख्येने अनेक हाय-फाय गाड्या व इतर वाहने धावतच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत तज्ज्ञ मंडळी पंचतारांकित हॉटेलांमध्ये तसेच टीव्हीवर चर्चा करतात. उलट अशा चर्चांनीच अधिक प्रदूषण होत आहे असा टोला सर्वोच्च न्यायालयाने लगावला. शेतकरी शेतात तण जाळत असल्यामुळे दिल्लीत प्रदूषणात वाढ झाली असा दावा काही तज्ज्ञ करतात. शेतकऱ्यांची शेतीतून होणारी कमाई किती याकडे कधी या तज्ज्ञांनी लक्ष दिले आहे का? मोठे प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी असताना व दिवाळी होऊन गेल्यानंतरही दिल्लीमध्ये फटाके वाजविले जात आहेत. ते रोखण्यासाठी सरकार काहीही करत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे किती वाहने आहेत, त्यातले किती अधिकारी रोज कार्यालयात येतात याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारली.

  कार्यालयामध्ये १०० अधिकारी उपस्थित राहण्याची गरज नसते. त्यातील ५० अधिकारी कार्यालयात हजर राहिले तरी काम सुरू ठेवता येते. बाकीच्यांना घरून काम करता येऊ शकते. असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषणCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय