शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

सरकारी उपाययोजना प्रभावहीन; शेअर बाजारात पुन्हा घसरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 6:10 AM

‘बुस्टर डोस’ पुरेसा नसल्याचे तज्ज्ञांचे मत : किरकोळ कर्जांतही एनपीए वाढला

नवी दिल्ली : तीन सत्रांच्या तेजीनंतर बुधवार आणि गुरुवार अशा सलग दोन सत्रांत शेअर बाजारांत पुन्हा एकदा घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या उपाययोजना प्रभावहीन ठरल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ५७२.३४ अंकांनी, तर निफ्टी १५७.0५ अंकांनी घसरला. दरम्यान, बरोजगारी ४५ वर्षांच्या नीचांकावर गेल्यामुळे किरकोळ कर्जाच्या अनुत्पादक भांडवलातही (एनपीए) आता वाढ झाल्याचे समोर आले आहे.

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोठ्या उपाययोजनांची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्यानंतर शेअर बाजारांनी उसळी घेतली होती. तथापि, या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. गुरुवारीही बाजार घसरले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.‘जेफरीज अ‍ॅण्ड एडेलविस ब्रोकिंग लि.’ या संस्थेने म्हटले की, सरकारचा ‘बुस्टर डोस’ नजीकच्या भविष्यात मागणी वाढविण्यास पुरेसा नाही, हे स्पष्ट होत आहे. याचाच अर्थ भारताच्या आर्थिक आघाडीवरील चिंता कायम असून शेअर बाजार आणि रुपयाला त्याचा फटका बसणे अटळ आहे. रुपया तर या महिन्यातच आशियातील सर्वांत वाईट कामगिरी करणारे चलन ठरला आहे. ‘आयडीबीआय कॅपिटल मार्केट सर्व्हिसेस लिमिटेड’चे संशोधन प्रमुख ए. के. प्रभाकर यांनी सांगितले की, जीडीपी वृद्धीदर ६ टक्क्यांच्या खाली आल्यास सरकारकडून आणखी प्रोत्साहन उपाय केले जाऊ शकतात. रिझर्व्ह बँकेलाही धोरणात्मक व्याजदरांत कपात करणे भाग पडेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर आधीच कपात करून नऊ वर्षांच्या नीचांकावर आणले आहेत.

बीएसई सेन्सेक्स ३ जून रोजी सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. आदल्या दिवशीच जाहीर झालेला तिमाही डाटा पाच वर्षांतील सर्वाधिक नरमाई दर्शवीत असतानाही बाजार तेजीत होता. मात्र, जुलैमध्ये त्याची कामगिरी २00२ नंतर सर्वांत वाईट राहिली. अर्थसंकल्पात मागणी वाढविणारे अपेक्षित उपाय नसल्यामुळे बाजाराला झटका बसला, असे सूत्रांनी सांगितले.सेन्सेक्स, निफ्टी सलग दुसऱ्या सत्रात घसरलेच्गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसºया सत्रात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८२.९१ अंकांनी घसरून ३७,०६८.९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९७.८० अंकांनी घसरून १०,९४८.३० अंकांवर बंद झाला.च्घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत येस बँक, एसबीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँक, आयटीसी, आरआयएल, एम अ‍ॅण्ड एम, टाटा मोटर्स व आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स ५७२.३४ अंकांनी, तर निफ्टी १५७.0५ अंकांनी घसरला.
प्राप्तिकराचे पाच स्लॅब, सरकारचा विचारप्राप्तिकराची अडीच लाखांची मर्यादा न वाढवता येत्या काळात प्राप्तिकराचे ५%, १०%, १५%, २०%, ३०% आणि ३५% असे पाच स्लॅब तयार करण्याची शिफारस सरकारने ‘डायरेक्ट टॅक्स कोड’साठी तयार केलेल्या कृती दलाने दिली आहे. त्यावर सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्या देशात प्राप्तिकराचे ५%, २०%, ३०% असे तीन स्लॅब आहेत.

देशातील बँकांना ७१ हजार ५४२ कोटींचा गंडागेल्या आर्थिक वर्षात देशातील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक उघडकीस आली आहे. त्यानुसार वर्षभरात देशात फसवणुकीचे सुमारे ६ हजार ८०१ प्रकारसमोर आले व यातून ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

टॅग्स :share marketशेअर बाजारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी