धर्मांतर, सुशासन दिनाला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे सरकारची स्पष्टोक्ती : सर्वांचा विकास हेच ध्येय

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:17+5:302014-12-20T22:28:17+5:30

नवी दिल्ली : विविध वादांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाप्रणीत रालोआ सरकारने हे वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधक नाहक ताणून धरत आहेत़ सुशासन आणि विकास हेच आमचे ध्येय आहे, असे सरकारने म्हटले आहे़

Government is giving unnecessary importance to conversion, good governance day: Development of everyone is the goal | धर्मांतर, सुशासन दिनाला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे सरकारची स्पष्टोक्ती : सर्वांचा विकास हेच ध्येय

धर्मांतर, सुशासन दिनाला अनावश्यक महत्त्व दिले जात आहे सरकारची स्पष्टोक्ती : सर्वांचा विकास हेच ध्येय

ी दिल्ली : विविध वादांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाप्रणीत रालोआ सरकारने हे वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधक नाहक ताणून धरत आहेत़ सुशासन आणि विकास हेच आमचे ध्येय आहे, असे सरकारने म्हटले आहे़
शनिवारी पत्रकारांशी बोलताना धर्मांतर आणि सुशासनाच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारचा जोरदार बचाव केला़ सरकार वादांनी घेरलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे़ प्रत्यक्षात काँग्रेस केवळ राजकीय लाभासाठी राज्यसभेचे कामकाज हाणून पाडत आहे़ धर्मांतर आणि सुशासन दिनाचे मुद्दे विरोधकांनी अनावश्यकपणे ताणले़ आमच्या सरकारला सुशासन हवे आहे़ विकास हवा आहे़ आमचे हेच ध्येय आहे आणि त्यावर आमचा भर आहे़ सबका साथ, सबका विकास, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तेव्हा त्यात हिंदू, मुस्लीम, आदिवासी, ख्रिश्चन सर्वांचाच विकास अभिप्रेत असतो, असे प्रसाद म्हणाले़
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित समूहांद्वारे उत्तर प्रदेशात धर्मांतर कार्यक्रम आयोजित केले गेले़ याकडे लक्ष वेधले असता त्यांनी चेंडू उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारकडे टोलवला़ प्रलोभन देऊन धर्मांतर होत असेल तर सरकार अशा कुठल्याही धर्मांतराविरुद्ध आहे़ उत्तर प्रदेशात असे कृत्य हाणून पाडण्याची जबाबदारी तेथील सरकारची आहे, असे प्रसाद म्हणाले़

Web Title: Government is giving unnecessary importance to conversion, good governance day: Development of everyone is the goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.