रेल्वेतील एफडीआयवर सरकारचे घूमजाव
By Admin | Updated: August 8, 2014 01:10 IST2014-08-08T01:10:42+5:302014-08-08T01:10:42+5:30
संरक्षण आणि रेल्वेतील थेट विदेशी गुंतवणुकीवर (एफडीआय)विरोधक आक्रमक झाले आहेत.

रेल्वेतील एफडीआयवर सरकारचे घूमजाव
>नवी दिल्ली : संरक्षण आणि रेल्वेतील थेट विदेशी गुंतवणुकीवर (एफडीआय)विरोधक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी एरव्ही विळ्य़ा-भोपळ्य़ाचे सख्य असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. तशातच केंद्राला रेल्वेतील एफडीआयबाबत 24 तासांच्या आत घूमजाव करणो भाग पडले.
रेल्वेचे पायाभूत क्षेत्र विदेशी गुंतवणूकदारांसाठी पूर्णपणो खुले करण्याची घोषणा झाल्याच्या दुस:याच दिवशी रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी रेल्वेच्या परिचालनात एफडीआयला परवानगी दिली जाणार नसल्याचा खुलासा केला.रेल्वेच्या परिचालनाचा भाग(ऑपरेशन)विचारात घेता निश्चितच एफडीआयला परवानगी दिली जाणार नाही. केवळ पायाभूत संरचना आणि अन्य क्षेत्रतच विदेशी गुंतवणुकीला मुभा असेल, असे त्यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांना सांगितले. रेल्वेमध्ये 1क्क् टक्के एफडीआयला परवानगी दिल्याच्या मुद्यावर विरोधकांनी संसदेत सरकारला धारेवर धरल्यानंतर गौडा यांनी हा खुलासा केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)
सर्वसाधारण आणि रेल्वे अर्थसंकल्पाच्या वेळी या मुद्यावर चर्चा झाली असून मंत्रिमंडळाने आता केवळ औपचारिकरीत्या निर्णय घेतला आहे,असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.