- शीलेश शर्मानवी दिल्ली : माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या ‘जय जवान-जय किसान’ या घोषणेचा उल्लेख करीत, मोदी सरकार त्यांना जगविण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला.जवानांना स्वखर्चाने गणवेश खरेदी करण्याची वेळ आली असल्याच्या वृत्ताचा आधार घेत राहुल यांनी ट्विट केले की, पंतप्रधान केवळ घोषणाबाजी करतात. पण जवानांना गणवेश व बूट विकत घेण्याची वेळ येते, ही शरमेची बाब आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात जे शेतकरी ठार झाले, त्यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच राहुल गांधी उद्या तिथे जात आहेत. तिथे त्यांची सभाही होणार आहे.
जवान, किसानांना जगविण्यात सरकार अपयशी : राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:57 IST