शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाॅडकाॅस्ट कंपन्यांमधील चिनी गुंतवणुकीवर सरकारची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 03:21 IST

प्रादेशिक भाषांमध्येही वापर- टेंसंट, शेनवई कॅपिटलचा समावेश

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : लडाख सीमेवर भारत- चीनचे सैन्य आमने- सामने असताना भारतीय पाॅडकाॅस्टच्या बाजारात चिनी कंपन्यांनी थोडीथोडकी नव्हे, तर ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.  माहिती सुरक्षितता, गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने २०० पेक्षा जास्त चिनी ॲपवर बंदी घातली; परंतु देशाच्या ग्रामीण भागात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या पाॅडकाॅस्ट ॲपमध्ये चिनी गुंतवणूक वाढते आहे. अद्याप दुर्लक्षित राहिलेली ही गुंतवणूकदेखील केंद्र सरकारच्या रडारवर आली आहे. या गुंतवणुकीची माहिती जमवण्याचे निर्देश मंत्रालयातील वरिष्ठांनी दिल्याचा दावा सूत्रांनी केला.

भारतीय हद्दीत घुसखोरीचा चीनचा मनसुबा भारतीय जवानांनी उधळला. जूनमध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षात २० जवान शहीद झाले. चीनने मारल्या गेलेल्या सैनिकांचा आकडा अद्याप जगापासून लपवला आहे. चकमकीनंतर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेत चीनला चांगलेच कोंडीत पकडले. चिनी गुंतवणूक रोखण्यापासून ते चिनी कंपन्यांना विकासकामांमध्ये सहभागी होऊ न देण्यापर्यंत भारताने चिनी ड्रॅगनला धडा शिकवला. यूसी ब्राऊझर, टिकटाॅकसारख्या लोकप्रिय ॲपवरही केंद्र सरकारने बंदी घातली. मात्र, पाॅडकाॅस्टमधील गुंतवणूक वाढलीच आहे. प्रतिलिपी या ॲपमध्ये चीनच्या टेन्संट कंपनीची गुंतवणूक आहे. भारतात सध्या टेन्संट, वुई चॅट ॲपवर बंदी आहे. कुलू एफएम, पाॅकेट एफएम, हेडफोन या पाॅडकाॅस्ट कंपन्यांनमध्ये चीनच्या टेंसंट, चिमिंग वेंचर पार्टनर्स, शनवेई कॅपिटल, टेंंसंट क्लाऊड, फोसन आरझेड कॅपिटल या कंपन्यांची गुंतवणूक आहे.

मार्केटमध्ये हजार कोटींची होतेय उलाढालn    भारतीय पाॅडकाॅस्ट मार्केटमध्ये १ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. प्राईसवाॅटरहाऊस कूपर्सच्या अहवालानुसार भारतात पाॅडकाॅस्ट ऐकणाऱ्यांची संख्या जगाच्या तुलनेत सर्वाधिक गतीने वाढते आहे. n    दरमहा भारतात ५० लाख लोक पाॅडकाॅस्टचा नियमित वापर करतात. हा आकडा सातत्याने वाढतो आहे. मराठीतही पाॅडकाॅस्ट वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. प्रादेशिक भाषांचाही त्यात समावेश आहे. 

२०११ साली एका मिनिटाला भारतात ४२ जण पाॅडकाॅस्ट वापरत होते. पाच वर्षांनी (२०१६) हा आकडा २३४ वर गेला, तर २०२१ साली हा आकडा ५३६ वर जाण्याची शक्यता आहे. इंग्रजी भाषेत एका मिनिटात पाॅडकाॅस्ट वापरणाऱ्यांची संख्या २०२१ साली १९९ वर जाण्याची आकडेवारी स्टॅटिस्टाने प्रसिद्ध केली आहे.

टॅग्स :chinaचीनbusinessव्यवसाय