शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 11:35 IST

सरकारचा निर्णय; दुसरा हप्ता देणार, तिसऱ्या हप्त्यास मात्र स्थगिती

ठळक मुद्देनिवृत्तिवेतन धारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जुलै २०२१ च्या वेतनासोबत दिली जाईल. थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट २०२१ च्या वेतनासोबत दिली जाईल.

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना १ जुलै २०२० रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. वित्त विभागाने याबाबतचा आदेश बुधवारी काढला. वेतन आणि निवृत्तिवेतनाचीही थकबाकी दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात ही रक्कम जमा करावी अथवा रोखीने अदा करावी.

निवृत्तिवेतन धारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जुलै २०२१ च्या वेतनासोबत दिली जाईल. थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट २०२१ च्या वेतनासोबत दिली जाईल. सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम सप्टेंबर २०२१ च्या वेतनासोबत दिली जाणार आहे. 

    कोणाला मिळेल रोखीने रक्कम?n निवृत्तिवेतनधारक तसेच जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांपैकी भविष्य निर्वाह निधी लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केली जाईल. n राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना किंवा अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा केली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. 

थकबाकीवर मिळेल व्याज

n १ जून २०२० ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अथवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा केली जाईल. n कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याच्या रकमेवर १ जुलै २०२० पासून व्याज मिळेल. भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा केलेली दुसऱ्या हप्त्याची रक्कम ३० जून २०२२ पर्यंत काढता येणार नाही. 

वित्त विभागाने काय म्हटले?

n सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम पाच समान हप्त्यांमध्ये पाच वर्षांपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने ३० मे २०१९ रोजी घेतला होता. n त्यानुसार पहिला हप्ता दिला, पण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्याने गेली दोन वर्षे दुसरा व तिसरा हप्ता दिलाच गेला नाही. n दुसऱ्या हप्त्याची थकबाकी देण्याचा निर्णय बुधवारी झाला. पण तिसरा हप्ता स्थगित ठेवण्यात येत असल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार