शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात योगासनांची सरकारी कर्मचाऱ्यांना मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 06:04 IST

केंद्राची योजना; वाय-ब्रेक ॲप करा डाऊनलोड

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये दररोज पाच मिनिटे योगासने करण्याची मुभा मोदी सरकारने दिली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वाय-ब्रेक ॲप डाऊनलोड करण्याच्या सूचना केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. योगासने केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तसेच ही योगासने कशी करावीत, याबद्दलची माहिती या ॲपमध्ये देण्यात आली आहे.

केंद्रीय आयुष मंत्रालयाने वाय-ब्रेक ॲप विकसित केले आहे. कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत, असे मोदी सरकारला वाटते. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम असायला हवे. याकरिताच कार्यालयात रोज पाच मिनिटे योगासने करण्यास कर्मचाऱ्यांना सरकारने सांगितले आहे. वाय-ब्रेक ॲपचा जास्तीत जास्त प्रसार करावा, असा आदेश केंद्राच्या सर्व खात्यांना देण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी त्याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला. त्याच्या एक दिवस आधी आयुष मंत्रालयाने वाय-ब्रेक ॲपचे अनावरण केले होते. या समारंभाला केंद्रीय कार्मिक खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह सहा केंद्रीय मंंत्री उपस्थित होते. त्यावेळी या मंत्र्यांनीही वाय-ब्रेक ॲपच्या माध्यमातून योगासने केली होती. 

ही आहेत वाय-ब्रेक ॲपची वैशिष्ट्ये

n    सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच कॉर्पोरेट जगतातील लोकही सतत कामात व्यग्र असतात. त्यावेळी येणारा तणाव दूर करण्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान अत्यंत उपयोगी आहे, असे या वाय-ब्रेक ॲपमध्ये म्हटले आहे.n    दिल्ली, मुंबई, चेन्नई यासह सहा प्रमुख महानगरामध्ये वाय-ब्रेक ॲपच्या वापराचा पथदर्शी प्रकल्प २०२० मध्ये राबविण्यात आला होता. तो यशस्वी ठरल्यानंतर आता हे ॲप खुले करण्यात आले आहे. 

टॅग्स :Yogaयोगministerमंत्री