जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. हे सरकार म्हणजे निवडणुका जिंकणारं मशीन आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याव्यतिरिक्त त्यांनी कलम ३७० आणि कृषी कायद्यांवरही भाष्य केलं. "पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत. जेव्हा पाकिस्तानसोबत संबंध बिघडतात तेव्हा सीमेवरील लोकांनाही त्याचा त्रास होतो. त्याचप्रमाणे चीनसोबत सुरू असलेल्या तणावामुळे आपले २२ जवानही शहीद झाले. हे सरकार म्हणजे निवडणुका जिंकणारं मशीन आहे," असं म्हणत मुफ्ती यांनी सरकारवर निशाणा साधला.
"हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन"; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 20:04 IST
पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्य
हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा
ठळक मुद्देभारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्यकलम ३७० चे अधिकार असते तर कृषी कायदे लागू केले नसते : मुफ्ती