सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न कळत नाही थोरात : निळवंडेचे पाणी देणार

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:35+5:302015-09-07T23:27:35+5:30

संगमनेर : यावर्षी पाऊस नसल्याने पिण्याचे पाणी, धान्य व चार्‍याचा मोठा दुष्काळ असून शहरी भाजपा सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न कळत नसल्याची टीका माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

Government does not understand the questions of farmers Thor: The water of the blue water supply | सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न कळत नाही थोरात : निळवंडेचे पाणी देणार

सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न कळत नाही थोरात : निळवंडेचे पाणी देणार

गमनेर : यावर्षी पाऊस नसल्याने पिण्याचे पाणी, धान्य व चार्‍याचा मोठा दुष्काळ असून शहरी भाजपा सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्न कळत नसल्याची टीका माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.
मालदाड येथे ज्येष्ठ नागरीक सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पं.स. सभापती रावसाहेब नवले, बाजार समिती सभापती शंकर खेमनर, शरयू देशमुख, हरिभाऊ वर्पे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, १५ वर्षे मंत्रीपदाच्या काळात आपण विविध खात्यांना न्याय दिला. सर्व खाती लोकाभिमुख केली. निळवंडेच्या कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आपले ध्येय आहे. गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा थोरात यांनी दिला. सध्या राज्यात दुष्काळाचे संकट असून शहरी भाजपा सरकारला प्रश्न माहीत नसल्याने प्रशासनात गोंधळ असल्याचे त्यांनी सांगितले.
तांबे म्हणाले, दुष्काळ असताना शेतकर्‍यांना कर्जमाफी न देता व्यापार्‍यांसाठी एलबीटी रद्द केला. हे भांडवलदारांचे सरकार खोटी आश्वासने देण्यात पटाईत आहे. नवले, तांबे, रामभाऊ नवले, भिमा नवले, मच्छिंद्र नवले, गोरक्ष नवले, अजय नवले, रघूनाथ नवले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शंकर नवले यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब नवले यांनी करून आभार मानले. कार्यक्रमास सतीश कानवडे, जगन्नाथ आव्हाड, बाळासाहेब गायकवाड, सुनील राऊत, रावसाहेब डूबे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकट-
मालदाड गाव परिसरातील अनेक शिवसैनिकांनी माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
फोटो-०७एसएएनपी०१ सत्कार

Web Title: Government does not understand the questions of farmers Thor: The water of the blue water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.