शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्याला दिलेल्या कर्जाची माहिती सरकारलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 15:44 IST

बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेला विजय माल्याला किती कर्ज दिले आहे याची माहिती सरकारला नसल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

नवी दिल्ली - बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेला विजय माल्याला किती कर्ज दिले आहे याची माहिती सरकारला नसल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माहिती आधिकार (आरटीआय)मध्ये वित्त मंत्रालयाला माल्याला दिल्या गेलेल्या कर्जाची माहिती विचारली होती. त्यामध्ये त्यांनी असे स्पष्ट केलं की, विजय माल्याला कीती कर्ज दिली याची माहिती आपल्याजवळ उपलब्ध नाही. राजीव कुमार खरे यांनी आरटीआय आवेदनामार्फत वित्त मंत्रालयाकडून विजय माल्याला देण्यात आलेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती.  

केंद्रीय सुचना आयोगाला (सीआईसी) वित्त मंत्रालयानं सांगितले की, विजय माल्याला किती कर्ज दिले याचा रेकॉर्ड आमच्या जवळ नाही. याबाबतची माहिती संबधित बँकांना अन्यथा आरबीआयजवळ असेल असेही मंत्रालयानं सांगितले. वित्त मंत्रालयाच्या या उत्तराला सीआईसीने संशयास्पद असल्याचे म्हटले. मुख्य सुचना आयुक्त आर.के माधुर यांनी वित्त मंत्रालयालातील आधिकाऱ्यांना आरटीआय आवेदन संबंधित सरकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे आदेश दिले. 

यापूर्वी सरकारनं दिली आहे माहिती - वित्त मंत्रालयाच्या आधिकाऱ्यानं आरटीआयच्या आवेदनामध्ये विजय माल्याला किती कर्ज दिले याची माहिती नसल्याचे स्पष्ट केलं असले तरी वित्त मंत्रालय माजी संसदेनं याची माहिती दिली आहे. वित्त राज्य मंत्री संतोष गंगवार यांनी 17 मार्च 2017मध्ये माल्या बद्दल उत्तर दिले. त्यांनी यात म्हटले आहे की, 2004 मध्ये विजय माल्याला कर्ज दिले होते. फेब्रुवारी 2008मध्ये ते भरण्याची मुदत होती. 2009 मध्ये 8, 040 कोटी कर्जाच एनपीए(नॉन परफॉर्मिंग एसेट) घोषित केलं होतं आशी माहिती देण्यात आली होती. विजय माल्यांची संपत्ती विकून 155 कोटींची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती त्यावेळी गंगावार यांनी दिली होती. 

काय आहे प्रकरण -

विजय माल्याने व्यवसायाच्या नावावर भारतातील बँकांकडून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे सर्व थकीत कर्ज तसेच ठेऊन त्याने इंग्लंडला पलायन केले होते. सद्या तो इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे.  त्यानंतर सीबीआय आणि इडीने केलेल्या कारवाईत माल्याची भारतातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसेच माल्याला फरार म्हणून घोषित करत त्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या